• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bjp new woman president who are the three women leaders in the running for the post of bjp national president gkt

BJP New Woman President : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या तीन महिला नेत्या कोण आहेत? जाणून घ्या!

पुढील काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सांगितलं जात आहे. यावेळी भाजपाला महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार का? याबाबत चर्चा सुरु आहेत.

July 4, 2025 19:38 IST
Follow Us
  • BJP New Woman President
    1/4

    भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत आहेत. विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडी देखील नुकत्याच करण्यात आल्या आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 2/4

    भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला विलंब झाल्याचं बोललं जात आहे. पण आता आणखी अधिक विलंब न होता पुढच्या काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची चर्चा आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 3/4

    भाजपाला पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. पण या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 4/4

    भाजपाला महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी या पदासाठी नेमकी कोणत्या महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत? याविषयीची जाणून घेऊयात.

  • 5/4

    भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोण भूषावेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. पण समोर आलेल्या वृत्तानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरु आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 6/4

    भाजपा नेत्या निर्मला सीतारमण या केंद्रांत २०१९ पासून अर्थमंत्री आहेत. भाजपातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक म्हणून निर्मला सीतारमण यांच्याकडे पाहिलं जातं आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 7/4

    भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वनथी श्रीनिवासन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. वनथी श्रीनिवासन यांनी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/4

    वनथी श्रीनिवासन या तामिळनाडूच्या कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या १९९३ पासून भाजपात कार्यरत आहेत. तसेच भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या त्या सदस्या देखील आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/4

    भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डी.पुरंदेश्वरी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. आंध्र प्रदेश भाजपाच्या माजी अध्यक्षा डी पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी नेत्या आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 10/4

    डी पुरंदेश्वरी या या युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कमध्ये ऑपरेशन सिंदूर शिष्टमंडळात देखील सहभागी होत्या.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
अमित शाहAmit Shahनिर्मला सीतारमणNirmala Sitharamanपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPभारतीय जनता पार्टी बीजेपीBharatiya Janata Party Bjp

Web Title: Bjp new woman president who are the three women leaders in the running for the post of bjp national president gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.