• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. chandrashekhar bawankule says tukebandi kayda cancels 1 guntha land can be sold farmers thanks govt asc

आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “येत्या १५ दिवसांत आम्ही एसओपी करू. सभागृहातील सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की या एसओपीमध्ये तुम्हाला वाटतील त्या सूचना आम्हाला कळवा.

July 9, 2025 19:21 IST
Follow Us
  • Chandrashekhar Bawankule says Tukebandi Kayda cancels
    1/9

    राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (९ जुलै) विधिमंडळात मोठी घोषणा केली. सरकार तुकडेबंदी कायदा रद्द करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. (PC : Maharashtra Assembly Live, Loksatta)

  • 2/9

    महसूलमंत्र्यांच्या या निर्णयाचं विरोधकांनी देखील स्वागत केलं आहे. हा कायदा रद्द केल्यामुळे ५० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. (PC : Maharashtra Assembly Live)

  • 3/9

    बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. (PC : Maharashtra Assembly Live)

  • 4/9

    महसूलमंत्री म्हणाले, “आपल्याला १ जानेवारी २०२५ ही कट ऑफ डेट ठेवून पुढे जावं लागेल (कायदा रद्द केल्यानंतर १ जानेवारी २०२५ पासूनच्या व्यवहारांसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल.). त्यानंतर मात्र आपल्याला UDCPR ((एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमन)) प्रमाणे काम करावं लागेल. म्हणजेच नियोजन प्राधिकरणाच्या नियमाने जावे लागेल. (PC : Maharashtra Assembly Live)

  • 5/9

    चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “येत्या १५ दिवसांत आम्ही एसओपी करू. सभागृहातील सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की या एसओपीमध्ये तुम्हाला वाटतील त्या सूचना आम्हाला कळवा. एसईएस महसूलकडे तुमच्या सूचना पुढील सात दिवसांत पाठवा. (PC : Maharashtra Assembly Live, Loksatta)

  • 6/9

    तुकडेबंदी कायद्याचा शेतकरी विरोध का करत होते?
    महाराष्ट्रात महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यानुसार राज्यात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. राज्य शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार एक, दोन किंवा तीन गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी-विक्री करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. (PC : Loksatta)

  • 7/9

    घर बांधण्यासाठी, विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी जमिनीची खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत होता. मात्र, तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यास शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही.(PC : Loksatta)

  • 8/9

    तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यानंतर आता लोक एक गुंठा, दोन गुंठे, तीन गुठे जमीन देखील खरेदी करू शकतील. (PC : Loksatta)

  • 9/9

    या निर्णयाबद्दल आमदार जयंत पाटील व आमदार विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचं अभिनंदन केलं. (PC : Maharashtra Assembly Live)

TOPICS
चंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleपावसाळी अधिवेशनMonsoon Sessionविधिमंडळ अधिवेशनAssembly SessionशेतकरीFarmers

Web Title: Chandrashekhar bawankule says tukebandi kayda cancels 1 guntha land can be sold farmers thanks govt asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.