-
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाप्रणित महायुतीला धोबीपछाड दिला होता. मविआने राज्यात ३१ तर महायुतीने १७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. मविआला ५० जागा देखील जिंकता आल्या नाहीत. तर महायुतीने २२५ हून अधिक जागा जिंकल्या. (PC : Shivsena UBT)
-
दोन निवडणुकांमध्ये सहा महिन्यांचं अंतर होतं. या सहा महिन्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकलं? याचं विश्लेषण शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (PC : Saamana)
-
उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत विधानसभेच्या पराभवाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. (PC : RNO)
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला, मतदार याद्यांचा घोटाळा झाला, बोगस मतदार आले, काही मतदारसंघात अखेरच्या क्षणी मतदार वाढले, यावर चर्चा चालू आहे. तसेच सरकारने काही योजना जाहीर केल्या होत्या, जसे की ‘लाडकी बहीण’सारखी योजना होती. यामध्ये पुढे सरकारकडून लोकांची फसगत झाली ती गोष्ट वेगळी. मात्र, या सगळ्यामुळे त्यांना निवडणुकीत यश मिळालं.” (PC : Saamana)
-
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले, “मविआत जागावाटपावरून खेचाखेच झाली. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून खेचाखेच चालू राहिली. मला-तुला, तू तू – मैं मैं असं शेवटच्या क्षणापर्यंत चालू होतं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेत एक वाईट संदेश गेला. यांच्यात (मविआ) आत्ताच इतकी खेचाखेच चालू असेल तर नंतर काय होईल असा प्रश्न लोकांना पडला. (PC : Shivsena UBT)
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या अपयशाचं दुसरं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी मी फेब्रुवारी महिन्यात प्रचाराला सुरुवात केली होती. त्यावेळी जागा जवळपास निश्चित होत्या. माझ्यासमोर माझे उमेदवार ठरले होते. परंतु, माझ्याकडे निवडणूक चिन्ह नव्हतं. विधानसभा निवडणुकीवेळी मात्र माझ्याकडे चिन्ह होतं, परंतु जागा कुठल्या असणार, कुठल्या जागेवर आपण कोणता उमेदवार देणार हे ठरलं नव्हतं. ही आपल्याकडून झालेली मोठी चूक होती. तसेच जागावाटपावरून तू तू – मैं मैं चालू होतं.” (PC : Shivsena UBT)
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीवेळी जे घडलं तीच चूक आपल्याला परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला काहीच अर्थ नाही. (PC : Saamana)
-
या सगळ्याला समन्वयाचा अभाव होता असं म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेलं होतं ही गोष्ट मान्य करावी लागेल. मविआत लोकसभा निवडणुकीवेळी आपलेपणा होता, विधानसभेला मात्र मीपणा समोर आला आणि आपला पराभव झाला.”(PC : Shivsena UBT)
-
जागावाटपाचा विषय खूप लांबल्याचं काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी देखील कबूल केलं आहे. (PC : Atul Londhe/FB)
Photos | लोकसभेला यश मिळवणारी मविआ विधानसभेत हरली कशी? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली पराभवाची कारणं
लोकसभा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यांचं अंतर होतं. या सहा महिन्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकलं? याचं विश्लेषण शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Web Title: Uddhav thackeray remark on why mahavikas aghadi defeated in assembly election 2024 asc