-
मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि परिसरातील लोक, घरे, हॉटेल्स आणि गावात चिखल, दगडाचा ढिगारा जमा झाला. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेचे समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ हृदयद्रावक आहेत.
-
सुभाष चंद्र सेमवाल या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ”आम्ही घाबरलो होतो आणि लोकांना पळून जाण्यासाठी ओरडलो, शिट्ट्या वाजवल्या.” दगड आणि पाण्याचा आवाज ऐकून तो त्याच्या कुटुंबासह पळून गेला. (Photo – PTI)
-
सेमवाल यांनी धारलीच्या हॉटेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पुराच्या पाण्याने कसे वेढले याची आठवण सांगितली. “अनेक जण बाहेर पळाले, पण ते वाहून गेले,” असे ते म्हणाले. (Photo – PTI)
-
एका व्हिडिओमध्ये, इमारती कोसळत असताना दिसत आहे. अनेकजण रडताना दिसत आहेत. (Photo – PTI)
-
धारली येथील अचानक आलेल्या पुरात सुमारे ६०-७० लोक अडकले आहेत. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गावाचे मोठे नुकसान झाले आहे आणि पुराचे पाणी घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये शिरले आहे. (Photo – PTI)
-
एसडीआरएफची पथके बचाव मोहिमेत ड्रोन, कॅमेरे आणि कटरचा वापर करत आहेत. रस्ते अजूनही बंद आहेत आणि वीज, मोबाईल नेटवर्कवर परिणाम झाला आहे. (Photo – PTI)
-
आतापर्यंत लष्कर आणि एनडीआरएफ पथकांनी १४० हून अधिक लोकांना वाचवले आहे. हर्षिल आर्मी कॅम्प, जो घटनास्थळापासून फक्त ४ किमी अंतरावर आहे तिथून १० मिनिटांत मदत पोहोचवली गेली. (Photo – PTI)
-
हर्षिलजवळील सुखी टॉप येथे दुसरी ढगफुटीची घटना घडली. याठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु सध्या देखरेख सुरू आहे. (Photo – PTI)
-
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बचाव कार्यांशी संबंधित बैठकीचे नेतृत्व करत आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर हवाई मार्गाने मदत पोहोचवण्यासाठी चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. (Photo – PTI)
उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे विनाश, प्रत्यक्षदर्शीमुळे समोर आली भयानक दृश्ये
मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि परिसरातील लोक, घरे, हॉटेल्स आणि गावात मोठा ढिगारा जमा झाला.
Web Title: Uttarkashi cloudburst leaves trail of destruction eyewitnesses reveal horrific scenes see photos kvg