-

आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. (फोटो-एएनआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त काही चिमुकल्या मुलींनी राखी बांधून सण साजरा केला. (फोटो-एएनआय)
-
मुंबईत आज भारतीय जनता पक्षाकडून रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींनी त्यांना राख्या बांधल्या.(फोटो-एक्स)
-
मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थित रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतल्या मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना राख्या बांधल्या. (फोटो-एक्स)
-
आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राखी बांधली. (फोटो-एक्स)
-
यावेळी माजी खासदार प्रितम मुंडे यांनी देखील आमदार धनंजय मुंडे यांना राखी बांधली. मुंडे बंधू भगिनींच्या रक्षाबंधनाचे फोटो धनंजय मुंडे यांनी शेअर केले आहेत. (फोटो-एक्स)
-
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांना राखी बांधली. (फोटो-एक्स)
-
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या. (फोटो-एक्स)
Raksha Bandhan 2025 : राजकीय नेत्यांचं लाडक्या बहिणींबरोबर रक्षाबंधन, पाहा फोटो!
Raksha Bandhan 2025 : आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनीही उत्सहात रक्षाबंधन साजरा केलं आहे.
Web Title: Raksha bandhan 2025 prime minister modi devendra fadnavis dhananjay munde pankaja munde celebrated raksha bandhan see photos gkt