• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sharad pawar on maratha reservation manoj jarange patil mumbai morcha update in politics gkt

Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “घटनेत दुरुस्ती…”

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे.

August 30, 2025 19:38 IST
Follow Us
  • Sharad Pawar on Maratha Reservation
    1/9

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 2/9

    मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून आज (३० ऑगस्ट) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 3/9

    मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 4/9

    मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 5/9

    तामिळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित करत घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार म्हणाले आहेत.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 6/9

    “आरक्षणाचे असे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. यामध्ये केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागेल”, असं शरद पवार म्हणाले आहेत.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 7/9

    “७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडवण्याच्या संबंधी निर्णय संसदेत घेतला पाहिजे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 8/9

    “आम्ही संसदेच्या काही सदस्यांबरोबर संवाद साधत आहोत. जर गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्याच्या घटकांना पटवून दिली पाहिजे”, असंही शरद पवार म्हणाले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 9/9

    दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar on maratha reservation manoj jarange patil mumbai morcha update in politics gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.