-
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये उभा राहतो आहे. या पुतळ्याने पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा जगातला सर्वात उंच असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
-
१०० फूट
छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा तब्बल १०० फूट उंच असणार आहे. तसेच ब्राँझ धातूपासून तो बनवला जात आहे. या पुतळ्याचा चौथरा ४० फूट उंच आहे. त्यामुळे हा त्यांचा जगातला सर्वात उंच पुतळा ठरतोय. सध्या या पुतळ्याचं काम प्रगतीपथावर आहे. -
पिंपरी चिंचवड महापालिका
महापालिकेतर्फे शंभुसृष्टी हा प्रकल्प राबवला जात आहे. त्याअंतर्गत या महाकाय पुतळ्याची उभारणी केली जात आहे. यासाठी ४८ कोटी रुपयांचे बजेट खर्च करण्यात येत असल्याची माहिती आहे. -
परिसर
बोराडेवाडी- मोशी या प्रभागात हा भव्य पुतळा साकारला जात आहे. काहीच दिवसांत त्याचे लोकार्पण होणार आहे. -
इतर पुतळे
सरसेनापती हंबीरराव मोहिते व १६ सेनापती- मावळ्यांचे शिल्पेही इथे साकारण्यात येणार आहेत. दरम्यान, शंभुसृष्टी अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांच्या थोर कारकीर्दीवर प्रकाश टाकला जाणार आहे. -
दरम्यान, हे सर्व काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि लेखक डॉ. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
-
(सर्व फोटो साभार- शितल घोलप इन्स्टाग्राम पेज) हेही पाहा- भारतातलं जुळ्यांचं गाव माहितीये का? इथे एवढे जुळे का जन्मतात? शास्त्रज्ञांनाही उकलले नाही गूढ…
Photos: ४० फुटांचा चौथरा, १०० फूट उंची; छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा कुठे साकारतोय? काय आहेत वैशिष्ट्ये?
Chatrapati Sambhaji Maharaj Statue: हे सर्व काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि लेखक डॉ. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
Web Title: Chhatrapati sambhaji maharaj pimpri chinchwad huge statue photos 100 ft bronze spl