• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sushant singh rajput and rhea chakraborty love story and breakup with ankita lokhande bmh

सुशांत-रियाची लव्हस्टोरी; अशी झाली होती दोघांची भेट

रियाच्या रिलेशनमध्ये गेल्यानंतर सुशांत पडला होता एकटा

Updated: January 21, 2023 13:29 IST
Follow Us
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला दीड महिना लोटला. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चर्चा सुरूच आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी थेट सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरच आरोप केले. रियावर पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या वादात सुशांत-रियाची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. पण, सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी सुरू कशी झाली माहिती आहे का? (फोटो : सोशल मीडिया/लोकसत्ता)
    1/10

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला दीड महिना लोटला. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चर्चा सुरूच आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी थेट सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरच आरोप केले. रियावर पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या वादात सुशांत-रियाची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. पण, सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी सुरू कशी झाली माहिती आहे का? (फोटो : सोशल मीडिया/लोकसत्ता)

  • 2/10

    बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअरबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात. रिया आणि सुशांतबद्दलही अशाच चर्चा होत असत. त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर नेहमी एकमेकांचे फोटो दिसून येत, त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं सांगितलं जायचं. दोघांनी त्यांच्यातील नातं जाहीर केलेलं नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतरच रियानं याबद्दल खुलासा केला होता.

  • 3/10

    सुशांत आणि रिया २०१३ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी सुशांत शुद्ध देसी रोमान्सच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. तर रियाही मेरे डॅड की मारूती या सिनेमाचं शुटिंग करत होती.

  • 4/10

    या दोन्ही सिनेमांचे सेट आजूबाजूलाच होता. त्याचवेळी रिया आणि सुशांत यांची भेट झाली. त्यानंतर सुशांत व रिया अनेक पार्ट्यामध्ये एकमेकांना भेटले.

  • 5/10

    नेहमीच्या भेटीतून दोघांमध्ये मैत्री झाली. त्यावेळी सुशांत अभिनेत्री अंकित लोखंडेच्या रिलेशनमध्ये होता. ज्यावेळी रिया सुशांतच्या आयुष्यात आली, त्यावेळी अंकिता आणि सुशांतमधील संबंध तणाव होता, असं वृत्त त्यावेळी माध्यमांमधून समोर आलं होतं.

  • 6/10

    अंकितासोबतचे संबंध बिघडत जात असतानाच सुशांत व रिया जवळ आले. दोघांच्या भेटी वाढल्या. त्यानंतर सुशांत व अंकिताचं ब्रेकअप झालं. दोघे ६ वर्षे रिलेशनमध्ये होते. त्यावेळी अशी चर्चा होती की, ते दोघे लग्नही करणार होते.

  • 7/10

    अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअपनंतर रिया आणि सुशांत सोबत फिरताना दिसायला लागले. त्यांचे फोटोही एकमेकांच्या सोशल मीडियातून दिसायला लागले होते.

  • 8/10

    रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं घराच्यांशी बोलणं कमी झालं होतं, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या लोकांनी केलं होतं. सुशांत कुटुंबीयांशी व मित्रांशी कमी बोलायचा. तसेच तो वारंवार फोन नंबरही बदलायचा, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं.

  • 9/10

    एकदा आजतक वृत्तवाहिनी बोलताना चित्रपट समीक्षक सुभाष के झा म्हणाले होते की,”रियासोबतच्या दोन वर्षांच्या रिलेशनमध्ये सुशांत खूप बदलला होता. रियासोबतच्या रिलेशनमध्ये गेल्यानंतर सुशांत काहीसा एकटा पडला होता. मूळात तो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचा.”

  • 10/10

    “सुशांत अंकितासोबत खुप खुश असायचा. त्याने एकदा मला सांगितलं होतं की तो वेळा लग्न करणार आहे. पहिलं त्याच्या घरी, दुसरं अंकिताच्या घरी. सुशांतच्या घरच्यांनाही अंकिता आवडायची,” असंही झा म्हणाले होते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरिया चक्रवर्तीRhea Chakrabortyसुशांत सिंह राजपूतSushant Singh Rajput

Web Title: Sushant singh rajput and rhea chakraborty love story and breakup with ankita lokhande bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.