• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. budget 2022 interesting facts about union budget presentation scsg

Photos: १० वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ते २९ फेब्रुवारीला सादर झालेलं बजेट; २० रंजक गोष्टी

१९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रवास…

Updated: January 31, 2023 12:22 IST
Follow Us
  • Budget 2022 interesting facts about Union Budget presentation
    1/22

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (३१ जानेवारी २०२२ रोजी) लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल (२०२१-२२) सादर केला़ आता सीतारामन मंगळवारी (१ फेब्रुवारी २०२२) सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

  • 2/22

    अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. प्रत्येक आस्थापन म्हणजे देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायतही आपला अर्थसंकल्प सादर करत असते.

  • 3/22

    ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करत. या पिशवीला ते ‘बुजेत’ असे म्हणत.

  • 4/22

    अर्थसंकल्पामध्ये निधी, खर्च, लेखे, तूट, मागण्या, विनीयोजन याचे आर्थिक नियोजन करण्याची रुपरेखा मांडली जाते आणि खर्च आवक याचा ताळ्मेळ कसा राहील याचा आडाखा बांधला जातो. जाणून घेऊयात याच अर्थसंकल्पाबद्दलच्या काही खास गोष्टी…

  • 5/22

    १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजेच २०१९ मध्ये निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरुन आज चौथ्यांदा बजेट सादर करण्यापर्यंतचा प्रवास आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.

  • 6/22

    अर्थसंकल्प हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ११२ अन्व्यये जाहीर केला जातो. अनुच्छेद ११२ अन्वये अर्थसंकल्प म्हणजे देशाचे वर्षभराचे आर्थिक लेखाजोखा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जातो. मात्र मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांमध्येच अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे.

  • 7/22

    सरकारचा कार्यकाळ संपत आला असेल अंतरिम बजेट मांडले जाते. यामध्ये पुढील सरकार सत्तेत येईपर्यंत देश चालवण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या विवरणासंदर्भात तरतूदी असता. फेब्रुवारी महिन्यामध्ये अंतरिम बजेट मांडले गेले होते. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकराचे अंतरिम बजेट पियुष गोयल यांनी सादर केले होते.

  • 8/22

    सन २००० पर्यंत बजेट संध्याकाळी ५. ०० वाजता मांडले जायचे. ही ब्रिटीशकालीन पद्धती होती. २००१ साली भाजप चेच शासन असताना यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना ही प्रथा बदलून सकाळी ११.०० वाजता बजेट मांडण्याची प्रथा सुरु झाली. बजेट अर्थात देशाचे वित्तमंत्री मांडतात.

  • 9/22

    आर के शन्मुखम चेट्टी यांनी २६, नोव्हेंबर, १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला.

  • अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून डिजीटलाइज पद्धतीने बजेट सादर केलं जातं.
  • 10/22

    अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात आणि या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो.

  • 11/22

    १९९१-९२ मध्ये अंतिम आणि अंतरिम बजेट वेगवेगळ्या पक्षांच्या दोन अर्थमंत्र्यांनी सादर केला. यशवंत सिन्हा यांनी अंतरिम बजेट संसदेत मांडला. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी सादर केला.

  • 12/22

    १९६५-६६ या वर्षांतील अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काळ्या पैशांविरोधातील धोरण मांडण्यात आले.

  • 13/22

    १९५८-५९ मध्ये अर्थमंत्रालयाच्या आयोजनानंतर अर्थसंकल्प मांडणारे पंडित जवाहरलाल नेहरु हे पहिले पंतप्रधान होते.

  • 14/22

    सर्वात जास्त १० वेळा बजेट सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांनी मिळाला. यामध्ये पाच वार्षिक आणि त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात एक अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी तीन अंतिम आणि १ अंतरिम बजेट सादर केला. देसाई त्यावेळी अर्थमंत्री आणि उप-पंतप्रधान होते.

  • 15/22

    मोरारजी देसाई यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच दोन्ही बजेट सादर केले. देसाईंनी १९६४-६८ सालच्या लीप ईयर अर्थात २९ फेब्रुवारी रोजी बजेट मांडला.

  • आर. वेंकटरमन हे एकमेव अर्थमंत्री होते, ज्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला.
  • 16/22

    ९० च्या दशकात तीन अंतरिम बजेट मांडण्यात आले. यशवंत सिन्हा यांनी १९९१-९२ आणि १९९८-९९ साठीचा अर्थसंकल्प मांडला. तर मनमोहन सिंह यांनी १९९६-९७ साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

  • 17/22

    पी. चिंदबरम वाणिज्य मंत्री झाल्यानंतर त्यांनी भारताचं आयात-निर्यात धोरण सलग आठ तास न थांबता पुन्हा लिहिले.

  • 18/22

    अरुण जेठली यांनी २०१४-१५ चे बजेट मांडले होते, मात्र मे महिन्यात मोदी शासन निवडून आल्यामुळे ते पूर्ण वर्षाचे बजेट नव्हते. त्यामुळे २०१५-१६ साठीचे बजेट हे मोदी सरकारचे पहिले पूर्ण वर्षाचे बजेट होते.

  • 19/22

    २०१९ साली अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या. यंदा म्हणजेच २०२२ मध्ये त्या त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • 20/22

    बजेट संसदेमध्ये मांडण्याच्या एक आठवडा अगोदर त्याचे प्रिंटींग पूर्ण होते. ह्यामध्ये असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद एका आठवड्यासाठी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक मध्येच असतो. त्यांना कोणालाही भेटता येत नाही. यासाठी प्रिंटींग च्या अगोदर “हलवा” हा गोड पदार्थ बनवून सर्वांना वाटली जाते. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला.

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४Budget Sessionकेंद्रीय अर्थसंकल्प २०२४ (Union Budget 2024)Union Budget 2024मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Budget 2022 interesting facts about union budget presentation scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.