-
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे पार पडला. (फोटो सौजन्य : पीएमओ/ ट्विटरवरुन साभार)
-
कार्यक्रम दोन वाजता सुरू होणार असला तरी देहूकरांनी साडेदहा वाजल्यापासून सभास्थानाकडे धाव घेतल्याचं पहायला मिळालं. (येथून पुढील सर्व फोटो : राजेश स्टीफन यांच्या सौजन्याने)
-
पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाह नागरिकांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळापासून दोन किलोमीटर दूरवरच अडवले. नंतर या वारकऱ्यांनी हे अंतर चालत पार केले.
-
मुख्य मंडपात आणि दोन उपमंडपात मिळून सुमारे दहा हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लावली.
-
पुरुष वारकरी पेहरावात होते. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी, भगवी टोपी आणि भगवे फेटे दिसत होते.
-
लहान मुलंही वारकऱ्यांप्रमाणे पेहराव करुन या कार्यक्रमाला हजर होती.
-
अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये या छोट्या वारकाऱ्यांचा फोटो घेताना पहायला मिळाले.
-
सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले
-
याशिवाय कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभास्थळी सोडण्यात आले.
-
मोदींच्या प्रत्येक सभेत जशी काळ्या कपड्यांवर बंदी असते तशाच पद्धतीने आजच्या सभेतदेखील काळे कपडे, मास्क, कुठल्याही प्रकारचं काळं कपडं घालून जाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. रुमाल, मास्क या सारख्या काळ्या रंगाच्या गोष्टी गेटवरच पोलिसांनी काढून घेतले.
-
पाण्याच्या बाटल्या नेण्यासही बंदी घालण्यात आल्याने प्रवेशद्वाराजवळ अशाप्रकारे रिकाम्या बाटल्यांचा खच लागला होता.
-
कुठल्याही प्रकारची पिशवी मंडपात घेऊन जाण्यास परवानगी नसल्याने प्रवेशद्वाराजवळच्या झाडाची वारकऱ्यांनी आशाप्रकारे मदत घेतली.
-
सभामंडपामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारापाशी पोलिसांनी सर्वांची तपासणी केली. त्यावेळी अनेकांच्या तंबाखूच्या पुड्याही पोलिसांनी जप्त केल्या. प्रत्येक प्रवेशद्वारावर तंबाखुच्या पुड्या, कंगवे, चाव्यांचे कीचैन आणि पाण्याच्या बाटल्या दिसत होत्या.
-
महिला पोलिसांचीही प्रवेशद्वाराजवळ नियुक्ती करण्यात आलेली. सर्व महिलांची तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्यात आला.
-
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना अशाप्रकारची सुरक्षा आणि नियम काही नवीन गोष्ट नाही. मात्र देहूमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान आले होते. त्यामुळेच देहूवासियांनाही या नियमांबद्दल कल्पना नसल्याने थोडा त्रास सहन करावा लागला. मात्र या त्रासाचा लवलेशहीनंतर कार्यक्रमादरम्यान पहायला मिळाला नाही.
Photos: बाटल्यांचा खच, Keychains ला बंदी अन् झाडांवरील पिशव्या… देहूत मोदींच्या कार्यक्रमातील सुरक्षा नियमांमुळे वारकऱ्यांची धावपळ
पंतप्रधान मोदी हे देहूमध्ये येणारे पहिले पंतप्रधान ठरले, मात्र त्यांच्या व्हिडीआयपी सुरक्षेमुळे कार्यक्रमाला आलेल्यांची किंचित गोची झाली
Web Title: Pm modi program in dehu no entry with black cloths tobacco and bags pune print news scsg