-
मागील काही दिवसांत महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर कुलाब्यातील भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
-
नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकूण ३८ कोटींचे मालक आहेत.
-
राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांचे सदस्य राहिले आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
-
२०१९ मध्ये कुलाब्यातून भाजपाच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणूक जिंकले, यावेळी राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुमारे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं.
-
राहुल नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकूण संपत्तीपैकी केवळ ३९ लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. नार्वेकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
-
राहुल नार्वेकर यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्सयूव्ही आणि मारुती ८०० अशी चारचाकी वाहनं आहेत. याशिवाय त्यांच्याकडे आलिशान गल्फ क्रेड ३१ पॉवर बोटदेखील आहे.
-
देशातील कोणत्याही सभागृहातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाची नोंद झाली आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. (सर्व फोटो सौजन्य- राहुल नार्वेकर फेसबूक)
Photos: मर्सिडीज बेंझ ते आलिशान बोटीपर्यंत, जाणून घ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे किती संपत्ती आहे?
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर कुलाब्यातील भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Web Title: From mercedes benz to luxury boats know how much wealth does assembly speaker rahul narvekar have rmm