Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mns chief raj thackeray son amit thackeray trekking in kokan scsg

Photos: धबधबे, हिरवळ, ओढे अन्… स्पेशल व्यक्तीसोबत अमित ठाकरेंचं आंबोलीत ट्रेकिंग; कोकणचा निसर्ग पाहून म्हणाले, “मी इथे…”

डोंगर, ओढे, धबधब्यांमधून प्रवास करत अमित ठाकरेंनी केलेल्या या ट्रेकिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

July 6, 2022 14:56 IST
Follow Us
  • Amit Thackeray trekking
    1/15

    महाराष्ट्रातील राजकीय वातारवण मागील काही दिवसांपासून ढवळून निघालेलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे मात्र मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कामासंदर्भात कोकण दौऱ्यावर आहेत.

  • 2/15

    याच कोकण दौऱ्यामध्ये त्यांनी नुकताच एक ट्रेक केला. या ट्रेकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 3/15

    रानमाणूस म्हणून लोकप्रिय असणारे पर्यावरणस्नेही पर्यटनाचे पुरस्कर्ते प्रसाद गावडे यांनी अमित यांना या ट्रेकमध्ये मार्गदर्शन केलं. गावडे यांच्या रुपाने अमित ठाकरेंना खऱ्या अर्थाने एक खास व्यक्ती या ट्रेकमध्ये वाटाड्याच्या रुपात सोबत होती.

  • 4/15

    “महाराष्ट्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना होस्ट करण्याची संधी आज मिळाली,” असं म्हणत गावडे यांनी या ट्रेकचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

  • 5/15

    “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आजची, मंगळवारची (५ जुलै २०२२ रोजीची) दुपार खूपच हटके होती,” असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी या ट्रेकसंदर्भातील माहिती एका पोस्टमधून दिलीय.

  • 6/15

    “पक्षाचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सावंतवाडी येथील संवाद बैठका झाल्यानंतर आंबोली घाटात चौकुळ येथे जायचा निर्णय घेतला,” असं शिंदे पोस्टमध्ये सांगतात.

  • 7/15

    “निसर्गरम्य परिसर, सगळीकडे दाटलेलं धुकं, त्यात अधूनमधून जोरात कोसळणारा पाऊस, खळाळती नदी आणि केगदवाडीतून दर काही मीटर अंतरावर कोसळणारे कुंभवडे गावचे धबधबे,” असा हा सारा ट्रेक झाल्याचं शिंदे सांगतात.

  • 8/15

    यावेळेस गावडे यांनी अमित यांना घोंगडीसारखं दिसणारं इरलंही अंगावर घालण्यासाठी दिलं.

  • 9/15

    अमित ठाकरेंनीही काही वेळं या खास ग्रामीण पद्धतीने पवासापासून बचाव कणारं इरलं घालून ट्रेक केला.

  • 10/15

    सह्याद्रीतील निसर्ग भ्रमंती करताना हा पर्यावरण संवेदनशील भाग शाश्वत जीवन शैलीवर आधारित पर्यटनातून कसा विकसित करता येईल या विषयावर आपल्याला अमित ठाकरेंसमोर विचार व्यक्त करता आल्याबद्दल गावडे यांनी समाधान व्यक्त केलंय.

  • 11/15

    अमित यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही होते.

  • 12/15

    कधी ओढ्यांमधून तर कधी दरीच्या काढावरुन वाट काढत हे सारं जण एका धबधब्याजवळ पोहोचले.

  • 13/15

    “अशा स्वीडिश वातावरणात रानफटका मारायला – ट्रेकिंग करायला कुणाला आवडणार नाही?,” असं विचारत शिंदे यांनी अमित ठाकरेंनी यावेळेस व्यक्त केलेली एक इच्छा सांगितली.

  • 14/15

    “अमित ठाकरेंनी रानमाणसाला (प्रसाद गावडे यांना) अगदी सहजपणे, “मी इथे कितीही वेळ काढू शकतो. मला पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल,” असं बोलून गेले,” असंही शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.

  • 15/15

    “या अनुभवाविषयी जास्त काही लिहिता येणार नाही. पण आम्हालाही अमितसाहेबांसोबत असा रानफटका मारायला पुन्हा पुन्हा आवडेल,” असंही शिंदे यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलंय. तसेच, “तुम्हीही कोकणातल्या या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडाल,” असा विश्वास शिंदे यांनी अमित ठाकरेंसोबत केलेल्या या ट्रेकनंतर व्यक्त केलाय.

TOPICS
अमित ठाकरेAmit ThackerayमनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Mns chief raj thackeray son amit thackeray trekking in kokan scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.