• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shivsena uddhav thackeray birthday special know about his wife rashmi thackeray family net worth income property house photos kak

Uddhav Thackeray Birthday : चार कोटींचे कर्ज, ११ कोटींची शेतजमीन अन् बरंच काही…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती माहितीये का?

Uddhav Thackeray Birthday Special : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.

July 27, 2022 10:45 IST
Follow Us
  • Shivsena Uddhav Thackeray Birthday special his property net worth house family
    1/24

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.

  • 2/24

    उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत.

  • 3/24

    राजकारणात येण्याआधी ते एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करायचे.

  • 4/24

    २०१९च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली.

  • 5/24

    शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

  • 6/24

    २०१९-२२ या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकूया.

  • 7/24

    उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे १४३ कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.

  • 8/24

    उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादक म्हणून काम पाहतात.

  • 9/24

    २०१८-१९ वर्षात उद्धव ठाकरेंचे वार्षिक उत्पन्न ३८ लाखांपेक्षा अधिक होते.

  • 10/24

    तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८० लाखांच्या घरात होते.

  • 11/24

    ठाकरे दाम्पत्याने शेअर मार्केट आणि इतर ठिकाणी एकूण ५५ कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

  • 12/24

    उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे प्रत्येकी तीन लाखांची एलआयसी पॉलिसी आहे.

  • 13/24

    ठाकरे दाम्पत्याकडे सोने आणि चांदीचे मिळून दोन कोटींपेक्षाही अधिक रकमेचे दागिने आहेत.

  • 14/24

    तर त्या दोघांच्याही नावावर रायगड जिल्ह्यात सुमारे ११ कोटींची शेतजमीन आहे.

  • 15/24

    याशिवाय अहमदनगर आणि मुंबई येथेही उद्धव ठाकरेंच्या मालकीची जमीन आहे.

  • 16/24

    मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ बंगले आहेत.

  • 17/24

    या बंगल्यांची एकूण किंमत ५३ कोटींच्या घरात आहे.

  • 18/24

    उद्धव ठाकरेंनी चार कोटींचे तर रश्मी ठाकरेंनी आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

  • 19/24

    उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत.

  • 20/24

    आदित्य ठाकरे आमदार असून राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

  • 21/24

    तेजसला राजकारणात फारसा रस नसल्याचे बोलले जात असले तरी अनेकदा निवडणूक प्रचारावेळी त्याने हजेरी लावली होती.

  • 22/24

    राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • 23/24

    (सर्व फोटो : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे/ फेसबुक)

  • 24/24

    (हेही पाहा : छायाचित्रकार ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री…उद्धव ठाकरेंच्या कारकि‍र्दीवर एक नजर)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena uddhav thackeray birthday special know about his wife rashmi thackeray family net worth income property house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.