• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. uddhav thackeray latest speech in mumbai on amit shah and eknath shinde rmm

“अमित शाहांना आव्हान, गद्दारांना इशारा” उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे, पाहा PHOTOS

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

September 21, 2022 23:21 IST
Follow Us
  • uuddhav thackeray on amit shah and eknath shinde
    1/15

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

  • 2/15

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं.

  • 3/15

    त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

  • 4/15

    मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत.

  • 5/15

    एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे.

  • 6/15

    मुंबईवरती सध्या गिधाडं फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे.

  • 7/15

    मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली आहे.

  • 8/15

    शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत.

  • 9/15

    शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते.

  • 10/15

    त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत.

  • 11/15

    इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात.

  • 12/15

    तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सागतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 13/15

    मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

  • 14/15

    यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे.

  • 15/15

    १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असंही उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.

TOPICS
अमित शाहAmit Shahउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shinde

Web Title: Uddhav thackeray latest speech in mumbai on amit shah and eknath shinde rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.