-
चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
-
भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
-
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
-
प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
-
अजित पवारांवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “येत्या २६ तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की ४४० व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या.”
-
बावनकुळेंच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपरोधिक टोलेबाजी केली आहे.
-
मला ४४० व्होल्टचा करंट लागला तर मी मरूनच जाईल, असं अजित पवारांनी म्हटलं.
-
अरे बापरे… ४४० व्होल्टचा करंट म्हणजे मी मरून जाणार… एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा काय जगू शकतो? – अजित पवार
-
आता माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल की काय? अशी उपरोधिक टोलेबाजी अजित पवारांनी केली.
-
त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. – अजित पवार
-
आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका.- अजित पवार
-
मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.- अजित पवार (सर्व फोटो- लोकसत्ता)
“…तर मी मरून जाईल, कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल”, अजित पवार असं का म्हणाले?
“…तर मी मरून जाईन,” अजित पवारांची प्रतिक्रिया
Web Title: Ajit pawar reaction on chandrashekhar bawankule statement about 440 voltage current chinchwad bypoll rmm