-
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा भारतीय वाहन बाजारात दबदबा वाढू लागला आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा कंपनीच्या दोन कार्सना बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने दोन्ही कार्ससाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही हायब्रिड कार्स आहेत. इनोव्हा हायक्रॉस आणि अर्बन क्रूझर हायरायडर अशी या दोन्ही कार्सची नावं आहेत. (PC : Toyota Bharat)
-
कंपनीने त्यांच्या डीलर्सनादेखील सांगितलं आहे की, या दोन कार्ससाठी सध्या बुकिंग्स घेऊ नका. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही कार्ससाठी इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंग्स येत आहेत, ज्यामुळे कंपनीचं उत्पादन आणि वितरणाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे भविष्यात वितरणात अडचणी येऊ नयेत यासाठी कंपनीने बुकिंग्स घेणं तात्पुरतं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा आणि सुझुकी या दोन कंपन्यांनी एकत्र येत हायब्रिड मॉडेल्स विकसित करून लाँच केले. या मॉडेल्सना भारतीय वाहन बाजारात तगडी डिमांड आहे. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही कार्सचं दमदार मायलेज हे तुफान मागणीचं प्रमुख कारण आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा हायरायडर कारचं मायलेज २७.९७ किमी प्रति लीटर इतकं आहे, तर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार २१.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. (PC : Toyota Bharat)
-
तगड्या मायलेजमुळे ग्राहक या कार्सच्या हायब्रिड मॉडेल्सना प्राधान्य देत आहेत. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटाच्या काही डिलर्सकडून माहिती मिळाली आहे की, हायक्रॉस आणि हायरायडर कारच्या टॉप स्पेक व्हेरिएंटला जोरदार मागणी आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा हायक्रॉस ZX (O) कारवरील वेटिंग पीरियड २.५ वर्षांवर पोहोचला आहे तर हायक्रॉस VX या व्हेरिएंटवरील वेटिंग पीरियड ८ ते १२ महिन्यांवर पोहोचला आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर या कारवरील वेटिंग पीरियड शहरांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त आहे. तर उर्वरीत भारतात ८ ते ११ महिने इतका आहे. (PC : Toyota Bharat)
‘या’ दोन गाड्यांसाठी ग्राहकांच्या रांगा, तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद, वेटिंग पीरियड २.५ वर्षांवर
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने अलिकडेच हायब्रिड इंजिनवाल्या कार्स लाँच केल्या आहेत. या वाहनांना ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
Web Title: Toyota innova hycross hybrid and urban cruiser hyryder bookings halted temporarily asc