Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. appasaheb dharmadhikari maharashtra bhushan 2023 lakhs of people witnessed event asc

Photos : ‘श्री सदस्यां’चा जनसागर! आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान, सोहळा पाहायला लाखोंची गर्दी

आपण सर्वत्र देव शोधतो, पण मला या अथांग सागरामध्ये तुमच्यामध्ये आप्पासाहेबांच्या रुपाने देवच दिसतोय, हे देखील नम्रपणे सांगतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी म्हणाले.

April 16, 2023 17:23 IST
Follow Us
  • Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan 2023
    1/9

    ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

  • 2/9

    या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • 3/9

    /या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

  • 4/9

    हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता. ही गर्दी पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अचंबित झाले. दोघांनीही आपल्या भाषणात या लाखोंच्या जनसागराचा उल्लेख केला.

  • 5/9

    लाखो लोक खारघरच्या या मैदानात सकाळपासूनच येत होते. त्यामुळे नवी मुंबईत खारखरच्या आसपासचे सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

  • 6/9

    मुंबई-पुणे महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

  • 7/9

    महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह मिळालेली मिळालेली २५ लाख रुपये ही रक्कम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे.

  • 8/9

    या पुरस्कार सोहळ्याला आलेले प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कोणत्याही प्रसिद्धी आणि आपेक्षेशिवाय सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला इतका मोठा जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”

  • 9/9

    पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आप्पासाहेब म्हणाले की, “पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे”

TOPICS
अमित शाहAmit Shahएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Appasaheb dharmadhikari maharashtra bhushan 2023 lakhs of people witnessed event asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.