• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is sonia duhan who has achieved a very important mission for sharad pawar scj

शरद पवारांसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी फत्ते करणाऱ्या सोनिया दुहान कोण आहेत?

May 8, 2023 09:05 IST
Follow Us
  • Sonia Duhan
    1/9

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाव महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण आहे त्यांनी दिलेला राजीनामा, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि मग त्यांनी हा निर्णय मागे घेणं. या सगळ्या प्रक्रियेत एक नाव चर्चेत आलं आहे ते नाव आहे सोनिया दुहान (सर्व फोटो सौजन्य-सोनिया दुहान-फेसबुक पेज)

  • 2/9

    सोशल मीडियावर सोनिया दुहान कोण आहेत याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या.

  • 3/9

    सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • 4/9

    पहाटेच्या शपथविधीच्या वेळी, म्हणजेच २०१९ मध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे गायब होते. ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं.

  • 5/9

    मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि चाळीस आमदारांनी त्यांना साथ दिली. गुवाहाटीतून गोवा या ठिकाणी आलेले आमदार गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळीही बोगस कागदपत्रं देऊन श्रेया कोठीवाल आणि सोनिया दुहान या दोघींनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा तो प्रयत्न फसला.

  • 6/9

    पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर जी कामगिरी सोनिया दुहान यांना दिली होती ती त्यांनी फत्ते केली. त्यानंतर त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातल्या तरुण सहकारी झाल्या असंही बोललं जातं.

  • 7/9

    सोनिया दुहान यांनी नुकतीच आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर महिलांचीही भेट घेतली होती त्यांचं म्हणणं काय हे त्यांनी जाणून घेतलं होतं.

  • 8/9

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घेताना जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या मागेच बसल्या होत्या.

  • 9/9

    सोनिया दुहान यांना जी जबाबदारी दिली जाते ती त्या अत्यंत हुशारीने आणि चाणाक्षपणे पार पाडतात. असंही त्यांच्याबाबत सांगितलं गेलंं आहे.

TOPICS
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Who is sonia duhan who has achieved a very important mission for sharad pawar scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.