-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदे’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी पत्रकारांकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर भाष्य केलं.
-
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, अनेक पत्रकार माझ्यासमोर येतात. काहींना मी उत्तरंही देत नाही. कारण काही उपयोगच नसतो.
-
तुमच्या सभांना गर्दी जमते, पण मतदान होत नाही, असंही काही पत्रकार विचारतात. अशा पत्रकारांना सांगू इच्छितो की, २००९ मध्ये माझे १३ आमदार निवडून आले. ते काय सोरटवर निवडून आले होते का? – राज ठाकरे
-
प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही येत नसतो- राज ठाकरे
-
ज्यादिवशी सत्ता हातात येते. त्या दिवसापासून सत्ता जायला लागते. ती सत्ता किती काळ टिकवायची, एवढंच तुमच्या हातात असतं- राज ठाकरे
-
विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात- राज ठाकरे
-
गर्दी जमते पण मतं मिळत नाहीत, असे प्रश्न आज मला विचारत आहात. पण तुम्ही भाजपा किंवा शिवसेनेचा इतिहास काढून बघा. या देशात काँग्रेस सोडून काहीही नव्हतं- राज ठाकरे
-
अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, पण मतदान व्हायचं नाही- राज ठाकरे
-
पण एक काळ आणि वेळ येतो. जेव्हा सभेची गर्दी मतांमध्ये दिसते- राज ठाकरे
-
अशाप्रकारचे चढ-उतार न पाहता. आपण कुठल्यातरी चॅनेलवर नोकरीला लागलो, म्हणून असे प्रश्न विचारायचे, असं करू नका- राज ठाकरे
-
तुम्ही जर जाहीरपणे आमचे वाभाडे काढणार असाल तर मग मी राज ठाकरे आहे, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. मी तर वाभाडे काढणारच आहे- राज ठाकरे
-
राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंताही व्यक्त केली.
-
हा कार्यक्रम ‘पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड’च्या वतीने आयोजित केला होता.
-
सर्व फोटो सौजन्य- Screengrab/Youtube
“राज ठाकरे आहे मी, ‘हा’ आमचा जेनेटिक प्रॉब्लेम”, राज ठाकरेंचा थेट इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदे’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Web Title: I am raj thackeray this is our genetic problem speech in pune on journalist questions rmm