• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. man gang raped 2nd wife with two stepsons in mumbai shoot obscene videos and uploaded on porn sites rmm

मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप; तीन महिने सुरू होता अत्याचार, मोबाइलमध्ये आढळले ७०० व्हिडीओ

नराधम आरोपींनी पीडितेला दारू पाजून सुमारे तीन महिने अत्याचार केला आहे.

September 4, 2023 21:58 IST
Follow Us
  • मुंबईत ट्रॉम्बे परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसह ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
    1/12

    मुंबईत ट्रॉम्बे परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसह ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे.

  • 2/12

    पीडित महिला ही आरोपीची दुसरी पत्नी आणि त्याच्या दोन मुलांची सावत्र आई आहे. पीडित महिलेला दारू पाजून तीन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार केला आहे.

  • 3/12

    नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ शूट करून पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले आहेत.

  • 4/12

    ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेनं २०१० मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. २०१५ मध्ये तिची आरोपीशी ओळख झाली. त्याच वर्षी दोघांनी लग्न केलं आणि दोघंही ट्रॉम्बे येथील चीता कॅम्प परिसरात राहत होते.

  • 5/12

    पीडितेला ८ आणि १० वर्षांची दोन मुलं आहेत. करोना काळात घरगुती हिंसाचारामुळे आरोपी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला आणि आपल्या दोन मुलांसह पीडितेबरोबर राहू लागला. आरोपीची दोन्ही मुलं २० आणि २२ वर्षांची आहेत.

  • 6/12

    पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीनं २२ जून रोजी तिला कथितरित्या गुंगीचं औषध मिसळलेलं शीतपेय पाजलं. यामुळे ती बेशुद्ध झाली.

  • 7/12

    यानंतर आरोपीनं आपल्या दोन मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर बलात्कार करण्यास भाग पाडलं.

  • 8/12

    नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि संबंधित व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला.

  • 9/12

    संबंधित व्हिडीओ आरोपीच्या फोनमध्ये आढळल्यानंतर शुक्रवारी (१ सप्टेंबर) पहाटे २ वाजता, पीडितेनं तिच्या भावांसह पोलिसांकडे जात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

  • 10/12

    उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी सांगितलं की, तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून अटक केली.

  • 11/12

    मुख्य आरोपीच्या फोनमध्ये त्याच्या पत्नीचे सुमारे ७०० पॉर्न व्हिडीओ सापडले.

  • 12/12

    पोलीस चौकशीत आरोपीनं पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

TOPICS
क्राईम न्यूजCrime NewsमुंबईMumbaiसामूहिक बलात्कारGang Rape

Web Title: Man gang raped 2nd wife with two stepsons in mumbai shoot obscene videos and uploaded on porn sites rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.