Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. uber cab driver abdul qadeer gives free snacks and wi fi to customers first aid kit and donation box is also available in his vehicle jshd import snk

प्रथमोपचारपासून स्नॅक्स-ज्यूसपर्यंत सर्व काही मोफत; दिल्लीच्या ‘या’ भन्नाट कॅबची सर्वत्र होतेय चर्चा, पाहा व्हायरल फोटो

दिल्लीचा उबेर चालक अब्दुल कादिर त्याच्या प्रवाशांना औषधे, पाणी, नाश्ता, वाय-फाय अशा मोफत सुविधा पुरवतो.

November 10, 2023 19:07 IST
Follow Us
  • uber Cab Driver
    1/7

    आजच्या काळात ऑटो आणि कॅब हे लोकांच्या वाहतुकीचे मुख्य साधन झाले आहेत. मात्र अनेकदा कॅब चालकांबाबत अनेक तक्रारी येत असल्याचे दिसून येते. यापैकी बहुतेक, राइड रद्द करण्यापासून ते रॅश ड्रायव्हिंगपर्यंतच्या घटना आहेत. पण आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरबद्दल सांगणार आहोत, जो लोकांना राइड देण्यासोबतच अनेक मोफत सुविधाही देतो.

  • 2/7

    ४८ वर्षीय उबेर ड्रायव्हर अब्दुल कादिर यांच्या कॅबमध्ये अनेक खास सुविधा आहेत. त्यांच्या कॅबमध्ये फर्स्ट एड किटपासून स्नॅक्स आणि ज्यूसपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत.

  • 3/7

    अब्दुलने प्रवाशांसाठी आवश्यक औषधे, पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स, ज्यूस, नमकीन, क्रीम, टिश्यू पेपर, बिस्किटे, कॉपी, पेन, वाय-फाय अशा गोष्टी आपल्या कॅबमध्ये ठेवल्या आहेत.

  • 4/7

    अनेकदा प्रवासी घाईघाईत घरातून निघताना महत्त्वाची वस्तू घेऊन जायला विसरले तर इथून घेऊन जाऊ शकता. या सर्व गोष्टींसाठी अब्दुल एकही अतिरिक्त पैसे घेत नाही. या सर्व गोष्टी तो त्याच्या प्रवाशांना मोफत देतो.

  • 5/7

    अब्दुलने एका विद्यार्थ्याला राईड दिल्यावर हे सर्व सुरू केले. प्रवाशाला मुलाखतीसाठी जायचे होते, मात्र त्याने सोबत कोणतेही सामान आणले नव्हते, त्यामुळे अब्दुलला अनेक ठिकाणी थांबावे लागले.

  • 6/7

    यानंतर अब्दुल स्वत: या सर्व आवश्यक वस्तू आपल्याजवळ ठेवू लागला. अब्दुलने आपल्या कॅबमध्ये काही बोर्ड लावले आहेत ज्यात त्याने लिहिले आहे की, आम्ही प्रत्येक धर्माच्या लोकांचा आदर करतो.

  • 7/7

    त्यांनी लिहिले आहे की, आम्ही लोकांना त्यांच्या कपड्यांवरून ठरवत नाही. त्यांनी लोकांना एकमेकांशी नम्र राहण्याचा संदेशही दिला आहे. समाजात चांगले काम करण्याचा संदेशही तो देतो. यासोबतच त्यांनी आपल्या कॅबमध्ये गरजूंसाठी दानपेटीही बसवली आहे.
    (फोटो स्त्रोत: उबेर)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: Uber cab driver abdul qadeer gives free snacks and wi fi to customers first aid kit and donation box is also available in his vehicle jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.