-
सूर्य – सुर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला तारा आहे. इतर ग्रह सुर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. सुर्याला पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा म्हणून ओळखले जाते. सुर्याभोवती प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष लागतात. (Photo : Nasa)
-
बुध – बुध हा सुर्यानंतरच पहिला ग्रह असून सुर्याच्या अगदी जवळचा ग्रह आहे. बुधचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा आहे. (Photo : Nasa)
-
शुक्र – शुक्र हा सुर्यानंतरचा दुसरा आणि बुधनंतर येणारा पहिला ग्रह आहे. पृथ्वीजवळचा ग्रह म्हणून सुद्धा शुक्राला ओळखले जाते. काळोख आकाशात पृथ्वीवरुन शुक्र खूप तेजस्वी दिसतो. (Photo : Nasa)
-
पृथ्वी – पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जि थे जीवन आणि मानवी वस्ती आहे. (Photo : Nasa)
-
मंगळ – मंगळ हा सूर्यमालेकील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे.पृथ्वीच्या शेजारी असलेला मंगळ ग्रह सर्वांना आकर्षित करतो. तांबूस लाल रंगाने मंगळ ग्रह पटकन लक्ष वेधून घेतो. (Photo : Nasa)
-
गुरू – गुरू ग्रह सूर्यमालेत पाचव्या स्थानावर आहे आणि आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे.गुरू हा हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला आहे. (Photo : Nasa)
-
शनि – शनि हा सूर्यमालेतील सहाव्या स्थानावर आहे. शनिला सुर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास २९ वर्षे लागतात. गुरूप्रमाणे हायड्रोजन आणि हेलियमपासून शनि ग्रह बनलेला आहे. (Photo : Nasa)
-
युरेनस – युरेनस हा अतिशय थंड ग्रह मानला जातो.याला बर्फाचा ग्रह मानला जातो. सौरमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. युरेनस ग्रहाला २७ उपग्रह आहेत. (Photo : Nasa)
-
नेप्च्युन – नेप्च्युन हा सर्वात लांबचा ग्रह आहे आणि सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. याला युरेनसप्रमाणे बर्फाचे ग्रह म्हणतात (Photo : Nasa)
Solar System : सुंदर सूर्यमाला! सूर्यापासून ते नेप्च्युनपर्यंत; नासाने शेअर केले अद्भुत फोटो
सूर्यमाला ही सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी आणि ग्रहांनी बनलेली आहे. सुर्यमालेत एकूण आठ ग्रह आणि सूर्य (तारा) आहेत. बुध, शुक्र , पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, आणि नेप्चून. नासाने इन्स्टाग्रामवर सूर्यमालेतील ग्रहांचे फोटो शेअर केले आहेत.
Web Title: A tour of the solar system the sun mercury venus earth mars jupiter saturn uranus neptune watch photos shared by nasa ndj