-

एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम पंजाबमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)
-
पंजाबमध्ये संयुक्त शेतकरी मोर्चाने महामार्ग रोखला आहे. त्याचवेळी राजधानी दिल्लीत भारत बंदमुळे वाहनांची लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. (पीटीआय फोटो)
-
संयुक्त शेतकरी मोर्चानुसार, भारत बंद सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. (पीटीआय फोटो)
-
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी शेतकरी रेल्वे रुळांवर बसल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.(पीटीआय फोटो)
-
पंजाब आणि दिल्लीशिवाय हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमध्येही भारत बंदचा प्रभाव दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)
-
संयुक्त शेतकरी मोर्चा (गैर-राजकीय) या बॅनरखाली काही शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो मोर्चा’ची हाक दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
‘दिल्ली चलो मोर्चा’मुळे लोकांना जास्त त्रास होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)
-
शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चामुळे हरियाणातील सोनीपतच्या कुंडली सीमेवर कडक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
त्याचबरोबर हरियाणा आणि पंजाब सीमेवर म्हणजेच शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी तळ ठोकला आहे. (पीटीआय फोटो)
पंजाबसह या ठिकाणी दिसला ‘भारत बंद’चा परिणाम! शेतकऱ्यांनी अडवले रस्ते अन् रेल्वे रुळ, पाहा फोटो
Kisan Andolan Bharat Bandh: शेतकरी संघटनांच्या आवाहनावर देशभरात भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. पंजाबमध्ये शेतककरी रस्ते आणि रेल्वे रुळावर उतरले आहेत.
Web Title: Bharat bandh 2024 kisan andolan punjab haryana protesting farmers occupy roads to railway tracks jshd import snk