-
हवामानबदलामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. (Photo:X/IndiaWeatherMan)
-
अवकाळी पावसाने मुंबई उपनगरातही हजेरी लावली आहे. (Photo:X/IndiaWeatherMan)
-
मुंबई शहराच्या अनेक भागांमध्येही अवकळी पावसामुळे वादळी वारा सुटला होता. (Photo:X/IndiaWeatherMan)
-
या हवामानबदलामुळे झालेल्या अवकळी वादळी वाऱ्याने मुंबई परिसरात अचानक काळोख झाला. (Photo:X/Rushikesh agre)
-
शहरातील या अवकाळी पावसाची अनेक दृश्य नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo:X/Anjali Tanna)
-
मुंबईमधील वादळी वारा मेट्रोचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही पाहायला मिळाला ज्यामुळे मुंबईमधील धुळीचे प्रमाण ही वाढले. (Photo:X/IndiaWeatherMan)
-
हवामान विभागानुसार मुंबई शिवाय ठाणे,पालघर, बदलापूर आणि कल्याण या भागांमध्ये पुढील २ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo:X/IndiaWeatherMan)
-
हवामान विभागानुसार मुंबईतील या अवकाळी वादळी वाऱ्याचा वेग ४० – ५० किमी प्रतितास इतका असू शकतो. (Photo:X/IndiaWeatherMan)
Mumbai Rain: मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक काळोख! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पाहा फोटो
हवामानबदलामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाची शक्यता. या अवकळी वादळी वाऱ्यामुळे मुंबई परिसरात अचानक काळोखाचे वातावरण झाले.
Web Title: Mumbai rain sudden darkness in mumbai and thane area heavy rain with strong winds see photo arg 02