-
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. कर कमी झाल्याने अनेक उत्पादने स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर काही गोष्टींवरील कर वाढल्याने अनेक उत्पादनांच्या किमती वाढतील. जाणून घेऊया या बजेटमध्ये काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले? (फोटो: रॉयटर्स)
-
कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांवर कस्टम सूट दिली जाणार आहे.
-
मोबाईल फोन, ॲक्सेसरीज, चार्जरवर कस्टम ड्युटी कमी. या वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्युटी १५% पर्यंत कमी केली जाईल.
-
एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील आयात शुल्क देखील काढून टाकण्यात आले.
-
कोबाल्ट, लिथियम आणि तांबेसह २५ महत्त्वाच्या खनिजांना सीमाशुल्कातून सूट दिली जाईल आणि त्यापैकी दोनवरील मूळ सीमाशुल्क कमी केले जाईल. अशा परिस्थितीत लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या कार, बाइक, ई-रिक्षा आणि स्कूटरही स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.
-
सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६% आणि प्लॅटिनमवर ६.४% पर्यंत कमी केले जाईल.
-
सोलर सेल आणि सोलर पॅनल्सच्या उत्पादनावर करात सूट दिली जाईल.
-
देशात बनवलेल्या चामड्याच्या वस्तू, कपडे आणि बूट स्वस्त होतील.
-
माशांच्या खाद्यावर ५% कस्टम ड्युटी कमी केली जाईल यामुळे मासळीचे भाव खाली येतील.
-
प्लास्टिकच्या वस्तूंवरील कस्टम ड्युटी २५% वाढली.
-
पीव्हीसीचे आयात कमी करण्यासाठी १० ते २५ टक्के वाढवले.
-
पेट्रोकेमिकल म्हणजे अमोनियम नायट्रेटवर कस्टम ड्युटी वाढली गेली.
-
टेलिकॉम वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्युटी १० ते १५ टक्क्यांनी वाढवण्यात आली.
-
सिगारेट देखील महाग झाल्या.
-
२०२४ बजेट प्लॅननुसार विमान प्रवासही महाग झाला आहे. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
BUDGET 2024: संसदेत अर्थसंकल्प सादर! जाणून घ्या २०२४ बजेटमध्ये काय आहे स्वस्त आणि काय महाग?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही महाग झाल्या.
Web Title: Budget 2024 budget presented in parliament know what is cheap and what is expensive in the 2024 budget arg 02