Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. krishna janmashtami 2024 know shubh muhurat significance and celebrations mathura vrindavan and the story behind lord krishnas birth gokulashtami sjr

Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक कथा

Story of Birth of Lord Krishna : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा होत आहे.

August 25, 2024 19:31 IST
Follow Us
  • Krishna Janmashtami 2024 Know shubh muhurat significance and celebrations Mathura Vrindavan and the Story Behind Lord Krishnas Birth gokulashtami
    1/15

    श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी २६ ऑगस्ट रोजी देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

  • 2/15

    हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घराघरांत, मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतो. (photo – indian express

  • 3/15

    पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री १२ वाजताच का सुरू होतो? जाणून घेऊ …

  • 4/15

    विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापारयुगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच सिद्धींनी संपन्न होते.

  • 5/15

    भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळची एक आख्यायिका सांगितले जाते की, कंसाने आपली बहीण देवकी हिचा वसुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता.

  • 6/15

    त्यावेळी एक आकाशवाणी झाली, की, देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक-एक करून सहा मुलांचा वध केला.

  • 7/15

    अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वसुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली. यादरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते.

  • 8/15

    या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला.

  • 9/15

    श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी (यदुवंश) होता. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते.

  • 10/15

    त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषांच्या मते, रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे; ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला.

  • 11/15

    त्याच वेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. याच शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते. तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परब्रह्मस्वरूप आहेत.

  • 12/15

    म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला. असे म्हणतात की, रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला, यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते.

  • 13/15

    अशीही एक कथा सांगितली जाते की, कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही मध्यरात्रीची निवड केली; जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील.

  • 14/15

    म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगांचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वसुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले.

  • 15/15

    याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो. (photo credit – indian express, pixabay, unsplash)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमराठी बातम्याMarathi News

Web Title: Krishna janmashtami 2024 know shubh muhurat significance and celebrations mathura vrindavan and the story behind lord krishnas birth gokulashtami sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.