• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm modi to visit brunei look into luxurious life of sultan hassanal bolkiah spl

Photos : 7000 कार्स, 2250 कोटींचा राजवाडा, अफाट श्रीमंत असलेल्या ब्रुनेईच्या पंतप्रधानांची PM मोदी घेणार भेट!

PM Modi to visit Brunei: ब्रुनेईचे सुलतान (पंतप्रधान) हसनल बोलकिया यांना पंतप्रधान मोदी भेटणार आहेत, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

Updated: September 2, 2024 11:06 IST
Follow Us
  • PM Narendra Modi
    1/18

    सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 2/18

    ब्रुनेईला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 3/18

    ब्रुनेईचे सुलतान (पंतप्रधान) हसनल बोलकिया यांनीही पीएम मोदींना आमंत्रित केले होते.

  • 4/18

    ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला जाणार आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 5/18

    ब्रुनेई हा आशियातील एक छोटासा देश आहे, या देशाला 1984 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. हा देश सुलतान हसनल यांच्या लक्झरी लाइफमुळे अनेकदा चर्चेत असतो. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 6/18

    ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. (AP Photo)

  • 7/18

    सुलतान हसनल यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्यांनी राहण्यासाठी बांधलेल्या राजवाड्याची किंमत तब्बल 2250 (अंदाजे) कोटी रुपये आहे. ‘इस्ताना नुरुल इमान’ पॅलेस असे या सोन्याने मढवलेल्या राजवाड्याचे नाव आहे. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 8/18

    बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, सुलतान हसनल यांचा हा पॅलेस जगातील सर्वात मोठा पॅलेस मानला जातो आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट आहे. (AP Photo)

  • 9/18

    20 लाख स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या जागेवर निर्माण केलेला त्यांचा राजवाडा 1984 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता. (AP Photo)

  • 10/18

    या महालात 1700 हून अधिक खोल्या आहेत. त्यापैकी 257 फक्त बाथरूम आहेत. याशिवाय या पॅलेसमध्ये 110 कार गॅरेज, 200 घोड्यांसाठी वातानुकूलित तबेले आणि 5 स्विमिंग पूल आहेत. या राजवाड्याचा घुमट 22 कॅरेट सोन्याने सजवण्यात आला आहे. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 11/18

    दरम्यान, 1980 पर्यंत सुलतान हसनल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. गेल्या 57 वर्षांपासून ते देशाच्या सुलतान पदाची धुरा सांभाळत आहेत. विविध अहवालांनुसार, त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत तेल साठा आणि नैसर्गिक वायूपासून येतो. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 12/18

    78 वर्षीय हसनल बोलकिया यांच्याकडे 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या 7,000 कार्स आहेत. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 13/18

    त्यांच्या कार कलेक्शनमध्ये 300 फेरारी आणि 500 रोल्स रॉयसचाही समावेश आहे. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 14/18

    एवढेच नाही तर सुलतान यांच्या लक्झरीमध्ये खासगी जेटचाही समावेश आहे. ( Photo: YouTube/AP)

  • 15/18

    सुलतानन बोलकिया यांनी त्यांच्या वापरासाठी बोईंग 747 विमान खरेदी केले आहे. ज्यावर त्यांनी सुमारे 3000 कोटी रुपये खर्च केले होते. या विमानामध्ये सोन्याचे वॉश बेसिन, लिव्हिंग रूम आणि बेडरूम अशा अनेक सुविधा आहेत. (AP Photo)

  • 16/18

    सुलतान हसनल बोलकिया यांचे एक खाजगी प्राणीसंग्रहालय देखील आहे, ज्याला त्यांचे खास अतिथीच भेट देऊ शकतात. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 17/18

    या प्राणीसंग्रहालयात 30 बंगाली वाघ, अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी आहेत. (Photo: Sultan of Brunei Foundation/Facebook)

  • 18/18

    रिपोर्ट्सनुसार, सुलतान यांची एकूण संपत्ती 30 अब्ज डॉलर्स एवढी आहे. (AP Photo)

TOPICS
केंद्र सरकारCentral Governmentट्रेंडिंग न्यूजTrending Newsनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm modi to visit brunei look into luxurious life of sultan hassanal bolkiah spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.