-
जगातील ९ सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी समोर आली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही यादी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे.
-
५९ वर्षीय इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल मोनिका बेलुची ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. या यादीत मोनिका बेलुची पहिल्या क्रमांकावर आहे.
-
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुनरो आहे. मर्लिन मुर्नो यांचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाले.
-
अमेरिकन अभिनेत्री ॲन हॅथवे ही जगातील तिसरी सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.
-
जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक चार्लीज थेरॉन ही सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
-
जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक नॅटली पोर्टमन एक इस्रायली-अमेरिकन अभिनेत्री आहे. ४३ वर्षीय नॅटलीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
ब्रिटिश अभिनेत्री एमिलिया क्लार्क जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
-
अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माती एम्मा स्टोन ही जगातील ७ वी सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.
-
हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक एंजेलीना जोली या यादीत ८ व्या स्थानावर आहे.
-
भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. या यादीत दीपिका ९ व्या स्थानावर आहे.
Photos: जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत ‘या’ एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश; पाहा फोटो
‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे आणि या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.
Web Title: Photos an indian actress also included in the list of the most beautiful actresses in the world see photo arg 02