-
उत्तराखंडचा लोकोत्सव, इगास, ज्याला बुढी दिवाळी असेही म्हणतात, हा उत्तराखंडच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा सण राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जतन करतो आणि गढवाल आणि कुमाऊं या प्रदेशात उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी भाजपाचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी हे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात साजरा करतात. (पीटीआय फोटो)
-
यावर्षी त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, बाबा रामदेव आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (एएनआय फोटो)
-
दरम्यान, इगास सणाबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत, ज्यामुळे या सणाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. असे मानले जाते की लंका जिंकून भगवान राम अयोध्येत परतल्याची बातमी दिवाळीच्या ११ दिवसांनी उत्तराखंडच्या डोंगराळ भागात पोहोचली. या कारणास्तव गढवाल आणि कुमाऊंमधील लोक हा दिवस इगास म्हणून साजरा करतात. (एएनआय फोटो)
-
याशिवाय गढवालचे शूर योद्धा माधोसिंग भंडारी, ज्यांना माधो सिंग मलेथा म्हणूनही ओळखले जाते, यांच्याशीही या उत्सवाचा महत्त्वाचा संबंध आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी टिहरी राज्याचा राजा महिपती शाह याने माधो सिंगला तिबेटशी युद्ध करण्यासाठी पाठवले होते. (पीटीआय फोटो)
-
याच काळात दिवाळीचा सणही आला, पण युद्धात व्यस्त असल्यामुळे माधोसिंग भंडारी आणि त्यांचे सैनिक या दिवशी घरी परतू शकले नाहीत. वीर माधोसिंग भंडारी आणि त्यांचे सहकारी शहीद झाले आहेत असे लोकांनी मानले, त्यामुळे कोणीही दिवाळी साजरी केली नाही. (पीटीआय फोटो)
-
पण दिवाळीच्या अकराव्या दिवशी ते युद्ध जिंकून परतले तेव्हा लोकांनी आनंदात इगासचा सण साजरा केला. इगस सणाच्या दिवशी लोक सकाळी गोडधोड पदार्थ बनवतात आणि संध्याकाळी घरांमध्ये दिवे लावतात. यावेळी पारंपरिक ढोल-दमाऊनच्या आवाजावर लोक नृत्य सादर करतात. (पीटीआय फोटो)
-
या दिवशी आणखी एक विशेष परंपरा केली जाते, ज्याला भैला खेळणे म्हणतात. भैला ही एक प्रकारची जळती मशाल आहे जी लोक दोरीच्या साहाय्याने फिरवतात. (पीटीआय फोटो)
-
ही मशाल केवळ लोकांच्या आनंदाचे प्रतीक नाही तर उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचे एक अद्भुत रूप आहे. (पीटीआय फोटो)
Photos : काय असतो ‘इगास उत्सव’?, हा सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदाराच्या निवासस्थानी लावली उपस्थिती
Igas Festival: उत्तराखंडचा इगास उत्सव, ज्याला अनेक लोक बुढी दिवाळी म्हणून ओळखतात, हा राज्यातील एक प्रमुख लोकोत्सव आहे. इगासच्या दिवशी, विशेष गोड पदार्थ तयार केले जातात आणि घरांमध्ये प्रार्थना केली जाते.
Web Title: Pm modi participates in igas bagwal traditional festival of lights of uttarakhand at bjp mp anil baluni residence spl