• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how big is gautam adani s empire in which sectors he does business spl

उद्योगपती गौतम अदाणी यांचे साम्राज्य किती आहे? ‘या’ क्षेत्रांमध्ये पसरलाय व्यवसाय

How big is Gautam Adani’s empire: गौतम अदाणी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण तुम्हाला माहित आहे का अदानी ग्रुपचा बिझनेस कोणत्या भागात पसरला आहे आणि त्यांचे साम्राज्य किती मोठे आहे.

Updated: November 22, 2024 13:31 IST
Follow Us
  • Gautam Adani Firms Market Cap
    1/12

    अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा गंभीर आरोप आहे. यूएसमधील वकिलांनी अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतरांवर २०२० ते २०२४ दरम्यान भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची लाच दिल्याचा आरोप केला आहे. ज्या अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांकडून अदाणी समूहाने या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्स उभे केले होते, त्यांच्यापासून हे सर्व लपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/12

    या आरोपांनंतर शेअर बाजार उघडताच अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांना दोन वर्षांतील हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे. याआधी २०२३ मध्ये हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स खूपच घसरले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/12

    फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलर्स (९.७० लाख कोटींहून अधिक) आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/12

    गौतम अदानी समूहाचा व्यवसाय पोर्ट (बंदर), एनर्जी (ऊर्जा), सिमेंट, विमानतळ आणि ग्रीन एनर्जी सेक्टर (हरित ऊर्जा क्षेत्र) मध्ये पसरलेला आहे. गौतम अदानींचे साम्राज्य किती मोठे आहे ते जाणून घेऊया (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/12

    अदाणी पोर्ट
    सध्या, अदानी पोर्ट्सचे भारतातील ७ सागरी राज्यांमधील १३ बंदरांवर वर्चस्व आहे. याशिवाय अदानी समूहाने इस्रायलच्या हैफा बंदरात गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेचे कोलंबो बंदर आणि व्हिएतनामच्या दा नांग बंदरातही गुंतवणूक केली आहे. याशिवाय अदानी समूहाची इंडोनेशिया आणि टांझानियामध्येही बंदरे आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/12

    अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड
    या कंपनीची स्थापना गौतम अदाणी यांनी १९८८ मध्ये केली होती. यामध्ये मेटल, फार्मा प्रॉडक्ट्स आणि कपड्यांच्या कमोडिटी व्यापारांचा समावेश आहे. (फोटो: रॉयटर्स)

  • 7/12

    अदाणी पॉवर एनर्जी
    या क्षेत्रात अदाणी पॉवरचे मोठे वर्चस्व आहे. कंपनीकडे भारतातील ६ राज्यांमध्ये १२,४१० मेगावॅट क्षमतेची थर्मल पॉवर आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/12

    अदाणी टोटल गॅस
    अदाणी टोटल गॅसचा व्यवसाय देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. यामधून निवासी घरे आणि कारखान्यांना ट्रान्स्पोर्ट आणि पाईपद्वारे नैसर्गिक नॅचरल गॅस पोहोचवण्याचा रिटेल व्यवसाय केला जातो. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/12

    अदाणी विल्मार
    अदाणी विल्मारच्या माध्यमातून गौतम अदानी भरपूर कमाई करतात. त्यांचा सर्वात मोठा ब्रँड फॉर्च्यून ऑइल आहे. मैदा, डाळी, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, सोया याशिवाय अदाणी विल्मारच्या फॉर्च्युन ब्रँड नावाखाली इतर अनेक खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 10/12

    अदाणी ग्रीन एनर्जी
    अदाणी ग्रीन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी रिन्यूएबल एनर्जी कंपनी आहे. कंपनीची एकूण क्षमता सुमारे १२.३ GW आहे. यामध्ये पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 11/12

    अदाणी सिमेंट
    ACC आणि अंबुजा सिमेंटमधूनही अदाणी भरपूर कमाई करतात. गौतम अदाणी यांच्या या व्यवसायाची कमान त्यांचा मुलगा करण अदाणी यांच्या हाती आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    अदाणी एयरपोर्ट
    देशातील विमानतळांवरही अदानी समूहाचा मोठा प्रभाव आहे. कंपनीकडे बेंगळुरू, जयपूर, गुवाहाटी, लखनौ, अहमदाबाद आणि तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांचे आधुनिकीकरण आणि संचालन करण्याची जबाबदारी आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
    हेही पाहा – Photos : श्रीवल्लीचा साडीमधील ग्लॅमरस लूक पाहिलाय का? रश्मिकाचे नवे फोटो व्हायरल

TOPICS
गौतम अदाणीGautam Adaniट्रेंडिंगTrending

Web Title: How big is gautam adani s empire in which sectors he does business spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.