-
रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि कुणा कामरा नंतर आता आणखी एक कॉमेडियन तरूणी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाने आईबद्दल अश्लिल विनोद केल्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
स्वाती सचदेवाने नुकतेच एक स्टँड-अप सादर केले होते. त्यात तिने आई आणि वडिलांचा उल्लेख करत वायब्रेटर (सेक्स टॉय) बद्दल विनोद केला. या विनोदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
आईला माझ्या खोलीतला व्हायब्रेटर सापडल्यानंतर पुढे पुढे काय झाले, हे स्वातीने कथित विनोदी स्वरुपात सांगितले. मात्र तिचा विनोद अनेकांना रुचलेला नाही. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
सदर व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावरून अनेकांनी तिच्यावर टिकेची झोड उठवली आहे. कॉमेडियन आता विनोदाच्या जागी अश्लीलता पसरवत आहेत. असा आरोप करण्यात येत आहे. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
स्वाती सचदेवा ही कॉमेडियन असून ती स्वतःला लेखिका आणि डिजिटल कटेंट क्रिएटरही म्हणवून घेते. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
काही काळापूर्वी LGBTQ वरील तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती स्वतःला बायसेक्शुअल असल्याचे म्हणते. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
स्वाती सचदेवा मुळची दिल्लीची असून तिचा जन्म १९९२ साली पंजाबमध्ये झाला होता. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तिने अमित्या विद्यापीठातून जाहिरत आणि मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
स्वाती सचदेवाने सुरुवातीच्या काळात मूक्त लेखक म्हणून काम केले. त्यानंतर ती स्टँड-अप कॉमेडीकडे वळली. तिने नेटफ्लिक्ससाठीही लेखनाचे काम केले आहे. (Photo – Swati Sachdeva Instagram)
-
रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या यूट्युब शोमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून यंत्रणाचा ससेमिरा त्याच्यामागे लागला आहे. आता स्वाती सचदेवाच्या बाबत हेच होणार का, हे पाहावे लागेल. (Photo – Swati Sachdeva Instagram)
Who is Swati Sachdeva: आईबद्दल अश्लील कॉमेडी करणारी स्वाती सचदेवा कोण आहे? रणवीर अलाहाबादियाप्रमाणे कारवाई होणार?
Who is Comedian Swati Sachdeva: कॉमेडियन स्वाती सचदेवाचा एका व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात तिने आईबद्दल बीभत्स विनोद केला. रणवीर अलाहाबादियाप्रमाणे आता तिच्यावरही टीका होत आहे.
Web Title: Who is comedian swati sachdeva her net worth instagram id mother vibrator joke video viral kvg