-
Photos of Myanmar Earthquake: अलीकडेच म्यानमारमध्ये आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपाचा आढावा घेत भारतीय अंतराळ संशोधन संस्स्था इस्रोने भूकंपामुळे झालेल्या बाधित भागांचे भूकंपाआधीचे आणि भूकंपानंतरचे नवे फोटो प्रसिद्ध केले आहेत. (Photo: Reuters)
-
या फोटोंमध्ये भयानक भूकंपामुळे झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे पाहायला मिळते आहे. (Photo: Reuters)
-
ज्यामध्ये मोठमोठे पुल तसेच मोठ्या-छोट्या इमारती कोसळलेल्या दिसत आहेत. हा फोटो मंडाले शहराचा आहे, यामध्ये शहरातील भूकंपामुळे उध्वस्त झालेला भाग पाहायला मिळतो आहे. (Photo: ISRO)
-
तर हा फोटो अवा पुलाचा (The AVA Bridge) आहे. इस्रोच्या फोटोमध्ये मंडाले शहरालगतचा हा पुलही उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo: ISRO)
-
तर हा सागिंग शहराच्या नुकसानीचा फोटो आहे. (Photo: ISRO)
-
मंडाले शहराला मोठ्या प्रमाणात या भूकंपाचा फटका फसला आहे. (Photo: ISRO)
-
दरम्यान, इस्रोच्या या फोटोंबद्दल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की हा ‘या नुकसानीचा हा प्राथमिक भाग आहे, तो उपग्रहांनी टिपला गेला आहे, नुकसानासंबंधीची सखोल माहिती प्रत्यक्षपणाने जमिनीवर पडताळून पाहणे आवश्यक आहे. (Photo: Reuters)
-
दरम्यान, म्यानमारमधील विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाचे आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही जहाजे भुकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी ५० टनांहून अधिक मदत साहित्य घेऊन यंगूनमध्ये दाखल झाली आहेत. याबद्दलची माहिती देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक्सवरून दिली आहे. (Photo: Dr. S. Jaishankar/X)
-
भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने २९ मार्च रोजी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले आहे. (Photo: Dr. S. Jaishankar/X)
-
याशिवाय २९ मार्चलाच भारतीय हवाई दलाच्या आयएएफ या विमानाने राजधानी यंगून शहरातील नागरिकांना १५ टन एवढी तातडीची मदत केली होती. (Photo: Reuters)
-
यामध्ये तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट्स, हायजीन किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांचा समावेश होता. (Photo: Dr. S. Jaishankar/X) हेही पाहा- व्हायरल गर्ल मोनालिसाचा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्कार प्रकरणात अटक, एकेकाळी स्पॉट बॉय म्हणून करायचा काम…
Myanmar Earthquake Photos: इस्रोच्या उपग्रहांनी टिपले म्यानमार भूकंपाचे भयावह फोटो, शहरांची झालीय दुरावस्था…
ISRO Myanmar Earthquake Photos: या फोटोंमध्ये भयानक भूकंपामुळे झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे पाहायला मिळते आहे.
Web Title: Myanmar earthquake 2025 isro releases satellite images of extensive damage across cities see photos spl