-
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
-
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटलं आहे.
-
आता यातच विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
विराट कोहलीची १०वी इयत्तेची मार्कशीट सध्या समोर येत आहे. विराट कोहलीला दहावीत किती टक्के मिळाले होते, पाहूयात…
-
विराटची मार्कशीट आयएएस जितिन यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
क्रिकेटपटूच्या रिपोर्ट कार्डसोबत एक खास कॅप्शनदेखील देण्यात आले आहे, ज्यामध्ये त्याच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे.
-
तुम्हीही पाहा तुमचा आवडता विराट कोहली किती अभ्यासू होता?
-
विराटने इंग्रजी, हिंदी आणि समाजशास्त्र विषयात चांगले गुण मिळवले आहेत.
-
विराटला इंग्रजीमध्ये ८३ गुण, हिंदीमध्ये ७५ गुण, सामाजिक शास्त्रात ८१ गुण, गणितात ५१ गुण आणि आयटीमध्ये ७४ गुण मिळाले आहेत.
-
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कमेंट करत विराटचे कौतुक केले.
-
“कागदावर गुण हे फक्त संख्या आहेत, खरे रत्न म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे,” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
-
(फोटो सौजन्य – लोकसत्ता, Virat Kohli/Facebook, indian express)
दहावीला विराट कोहलीनं नेमकं किती मार्क मिळवले? गणित विषयातील मार्क पाहून चाहते झाले अवाक्
Virat Kohli’s Class 10 Marksheet: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल झाली. दहावीला कोहलीनं नेमकं किती मार्क मिळवले, जाणून घ्या…
Web Title: Virat kohlis class 10 marksheet goes viral heres how he scored in school pdb