• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. hundreds of deaths due to multiple stampedes in ten years rcb bengaluru new delhi rajahmundry mahakumbh spl

राजमुंदरी, महाकुंभ ते बंगळुरू; गेल्या दहा वर्षांमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनांनी शेकडो मृत्यू

विजयानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: June 7, 2025 16:01 IST
Follow Us
  • Stampede incidents in the last 10 years
    1/10

    यंदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजय मिळवला. तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचा चषक उंचावला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, मात्र या आनंदाला गालबोट लागणारी एक घटना घडली. विजयानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 2/10

    दरम्यान, यापूर्वीही धार्मिक कार्यक्रम, मेळावे, सत्संगामध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्देवी घटना घडून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. प्रश्न असा आहे की अशा घटना घडण्यामागचं कारण काय? एका घटनेतून जागरूक झाल्यानंतरही आपण पून्हा कसे हलगर्जीपणाने वागू शकतो? आयोजक, प्रशासन की नागरिक यामध्ये दोष द्यायचा तरी कोणाला? चला जाणून घेऊ मागच्या दहा वर्षातल्या चेंगराचेंगरी आणि त्यातील नुकसानाबद्दल.. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 3/10

    राजमुंदरी पुष्करम २०१५
    १४ जुल्ले २०१५ या दिवशी आंध्र प्रदेशमधील राजमुंदरीमध्ये पुष्करम उत्सवादरम्यान गोदावरी नदीवर हजारो लोक पोहोचले होते. मात्र घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत २७ लोकांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 4/10

    वैष्णोदेवी मंदिर २०२२
    १ जानेवारी २०२२ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेतील जखमींचा आकडा मोठा होता. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 5/10

    हाथरस २०२४
    उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी भोलेबाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात १२१ जणांचा बळी गेला तर अनेक लोक जखमी झाले होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 6/10

    प्रयागराज महाकुंभ २०२५
    प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेने या मालिकेत नवा अध्याय जोडला गेला आहे. चाळीस दिवस चालणार्‍या महाकुंभमेळ्यातही चेंगराचेंगरीने भाविकांचा मृत्यू झाला. महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली होती. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 7/10

    नवी दिल्ली २०२५
    १५ फेब्रुवारी २०२४ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता आणि डझनभर लोक जखमी झाले होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 8/10

    रेल्वे स्थानकावर जमलेली गर्दी प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात होती. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 9/10

    बंगळुरू २०२५
    आरसीबीआयपीएल संघाच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू हेही पाहा- (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 10/10

    (फोटो- लोकसत्ता संग्रहित) हेही पाहा – चिनाब पुलाव्यतिरिक्त भारतातल्या टॉप ५ पुलांबद्दल जाणून घ्या, काय आहे त्यांची खासियत?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending NewsबंगळुरुBengaluruरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूRoyal Challengers Bangalore

Web Title: Hundreds of deaths due to multiple stampedes in ten years rcb bengaluru new delhi rajahmundry mahakumbh spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.