-
संघर्षग्रस्त इराणमधून १०० हून अधिक भारतीय विद्यार्थी दिल्लीत सुरक्षितपणे पोहोचले आहेत. हा क्षण त्यांच्या कुटुंबांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी खूप दिलासा देणारा होता. ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात भारतीय दूतावासाच्या मदतीने आर्मेनियातून प्रथम स्थलांतरित झालेल्या ११० विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यात आले. तासन्तास वाट पाहत असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांना परत आलेले पाहून आनंदाश्रूही आले.
-
भारत सरकारच्या मदतीने सुरू केलेल्या ‘सिंधू’ मोहिमेअंतर्गत, बुधवार, १८ जून २०२५ रोजी आर्मेनियातील येरेवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर, भारतात परतण्यासाठी भारतीय विद्यार्थी विमानात बसले तो क्षण. (Photo: X@MEAIndia)
-
इराणहून आर्मेनियामार्गे परतणारे भारतीय विद्यार्थी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडले तेव्हा त्यांचा आनंद व्यक्त करताना. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. (Photo: X@MEAIndia)
-
इराणच्या दुतावासान सांगितले काही भारतीय विद्यार्थी इस्त्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत आणि इराणचे परराष्ट्र मंत्रालय भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. (Photo: PTI)
-
त्याचवेळी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारत सरकार परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. (Photo: X@MEAIndia)
-
११० विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या मीर खालिफ याने इराणमधील तणावाच्या स्थितीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, “आम्ही क्षेपणास्त्रे पाहू शकत होतो. तेथे युद्ध सुरू होते. आमच्या भागात देखील बॉम्बस्फोट झाला. आम्हाला परिस्थितीची खूप भीती वाटत होती. मला आशा आहे की आम्हाला ते दिवस पुन्हा पहावे लागणार नाहीत.” (Photo: PTI)
-
बुधवार, १८ जून २०२५ रोजीचे आर्मेनियातील येरेवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे चित्र. (Photo: PTI)
-
आर्मेनियाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात चढण्यासाठी भारतीय विद्यार्थी विमानतळावर पोहोचले तो क्षण. (Photo: X@MEAIndia)
-
११० विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरले, यानंतर जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांचे ऑपरेशन सिंधू सुरू केल्याबद्दल आभार मानले. (Photo: PTI)
-
इराणमधील उर्मिया युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे भारतीय विद्यार्थी भारतात परतण्यासाठी विमानाची प्रतिक्षा करताना. (Photo: PTI)
-
गेल्या शुक्रवार पासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढला असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना तेहरानमधून बाहेर काढले जात आहे. (Photo: PTI) हेही पाहा- इस्रायल-इराण संघर्षाची भीषणता दर्शवणारे फोटो; दोन्ही देशांत नजर जाईल तिथपर्यंत फक्त उद्ध्वस्त स्थिती, पाहा Photos
Israel-Iran conflict : ११० विद्यार्थी सुखरूपपणे दिल्लीत पोहोचले; ‘ऑपरेशन सिंधू’चा भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा, पाहा फोटो…
Operation Sindhu Israel Iran conflict : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत भारतीय दूतावासाच्या मदतीने ११० विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यात आले आहे.
Web Title: Operation sindhu evacuates indian students home amid iran israel conflict see pictures spl