-
इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाल्यापासून, अमेरिका या युद्धात इस्रायलला मदत करेल असा अंदाज बांधला जात होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही तसे इशारे वेळोवेळी दिले होते. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
त्यानंतर, रविवार २२ जून रोजी अमेरिकेने या युद्धात उडी घेतली आणि इराणच्या तीन अणुस्थळांवर बॉम्ब टाकले. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी दोन बी-२ स्टील्थ बॉम्बर्सचा वापर केला. (Photo: Reuters)
-
बी-२ बॉम्बर काय आहे?
बी-२ स्टेल्थ बॉम्बर हे अमेरिकन हवाई दलातील सर्वात खास शस्त्रांपैकी एक आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
अमेरिका बऱ्याच काळापासून अशा ऑपरेशन्समध्ये आपल्या स्टेल्थ (कमी आवाजाचे तंत्र) तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
१९८९ पासून बी-२ स्टेल्थ बॉम्बर हे अमेरिकन हवाई दलाचा अविभाज्य भाग आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
बी-२ स्टेल्थ बॉम्बर रडारद्वारे सहज ओळखता येत नाही. कमी आवाजामुळे ते शोधणे कठीण होते. ते कोणत्याही उंचीवर उडू शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींच्या नजरेतूनही सुटते. (AI Photo)
-
ते अशा प्रकारे डिझाइन केले आहे की रडारमध्ये दिसल्यावर ते एका लहान पक्ष्यासारखे दिसते. यासोबतच, एकदा इंधन भरल्यानतंर ते ११ हजार किलोमीटर हवेतील अंतर कापू शकते. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या सैन्याने इराणवर यशस्वीरित्या एअर स्ट्राईक केला आहे. आम्ही इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आता इराणने शांततेच्या मार्गावर आले पाहिजे. आम्हालाही शांतता हवी आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. शिवाय त्यांनी इस्रायली सैन्यांचे अभिनंदनही केले. (Photo: AP) -
इस्रायलमध्ये शाळा, कॉलेज बंद
इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यानंतर आता युद्धाची तीव्रता वाढणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात इस्रायलने देशात आणीबाणी लागू केली आहे. तसेच आज इस्रायलमधील शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत. इतकेच नाही तर, इस्रायलने हवाई क्षेत्रही बंद केले आहे. दरम्यान, इराणवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र) हेही पाहा: Iran Israel War : क्लस्टर बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक असतात का?
US attacks Iran : काय आहे बी-२ बॉम्बर? अमेरिकेनं इराणवरील हल्ल्यात केला वापर…
B2 stealth Bomber, US : आता अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकेने त्यांच्या बी२ बॉम्बरचा वापर करून इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला आहे. चला काय आहे बी२ बॉम्बर? ते जाणून घेऊयात..
Web Title: What are b2 stealth bomber that us used to attack nuclear sites in iran spl