-
५० वर्षांपूर्वी १९७५ साली २५-२६ जूनच्या मध्यरात्री आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती. (Photo: Indian Express)
-
या घटनेला लोक काळा दिवसही मानतात. आणीबाणी लागू होताच विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली, माध्यमांवर बंधन लादण्यात आली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्येही आणीबाणी (Emergency) लागू करण्याची तरतूद आहे. काही देशांमध्ये, ही तरतूद नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा अंतर्गत अशांतता यांसारख्या परिस्थितींसाठी आहे, तर काही देशांमध्ये आर्थिक संकट किंवा इतर कारणांसाठी देखील आणीबाणी लागू केली जाते. (Photo: Pexels)
-
आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार, प्रक्रिया आणि आणीबाणीच्या काळात वापरले जाणारे अधिकार वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात.. (Photo: Pexels)
-
भारताव्यतिरिक्त आणीबाणीची तरतूद असलेले देश:
अमेरिका:
अमेरिकेमध्ये, राष्ट्राध्यक्षांना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, विशेषत: जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. (Photo: Pexels) -
जर्मनी:
जर्मनीच्या संविधानामध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत आणि काही प्रमाणात भारतीय संविधानावरही त्याचाच प्रभाव आहे. (Photo: Pexels) -
फ्रान्स:
फ्रान्समध्ये, राष्ट्राध्यक्षांना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, विशेषत: जेव्हा देशाच्या संस्था, राष्ट्राच्या अखंडत्वाला धोका निर्माण होतो. (Photo: Pexels) -
रशिया:
रशियामध्ये, राष्ट्राध्यक्षांना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, विशेषत: जेव्हा देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. (Photo: Pexels) -
याव्यतिरिक्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम यांसारख्या अनेक देशांमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत विशिष्ट अधिकार वापरण्याची तरतूद आहे. हेही पाहा- Photos : इराणचं नागरिकत्व सोडून स्पेनला स्थायिक होणाऱ्या सुंदर बुद्धिबळपटूची संघर्षमय गोष्ट…
भारताशिवाय ‘या’ देशांकडेही आहे आणीबाणीची तरतूद; अंमलबजावणी प्रक्रिया काय असते?
आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार, प्रक्रिया आणि आणीबाणीच्या काळात वापरले जाणारे अधिकार वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात..
Web Title: These countries also have provisions to impose an emergency america germany france russia canda spl