-
Jagannath Temple History: आजपासून ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात होत आहे. (PTI Photo)
-
ही परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक खूप गर्दी करतात. दरम्यान आज आपण जग्गनाथ मंदिर कोणी बनवले तसेच त्याबद्दलची अद्भूत रहस्ये जाणून घेणार आहोत… (File photo)
-
हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ भगवान बलभद्र व बहीण देवी सुभद्रा त्यांच्या जन्मस्थळी नऊ दिवसांसाठी जातात. (File photo)
-
यंदा भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेसाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन पाहण्यासाठी १०,००० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पुरी येथे पाठविण्यात आले आहे. (PTI Photo)
-
जगन्नाथ मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि महाभारतात उल्लेख केलेला प्रसिद्ध राजा इंद्रद्युम्न याने त्याची स्थापना केली असे मानले जाते. (File photo)
-
कोणी बांधले?
आख्यायिकेनुसार, राजा इंद्रद्युम्नने भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नीलमाधवची मूर्ती शोधून काढली आणि मंदिराचा पाया घातला. हे मंदिर १० व्या शतकात चोडगंगा वंशातील राजा अनंतवर्मा चोडगंगा यांनी बांधले होते. (File photo) -
बांधकाम
ऑमंदिराचे बांधकाम ही एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती जी अनेक वर्षे चालली. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या होत्या, ज्या एका विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून बनवल्या गेल्या होत्या. या मूर्ती दर १२ किंवा १९ वर्षांनी बदलल्या जातात. (PTI Photo) -
आक्रमण
इतिहासामध्ये डोकावून पाहिल्यास या मंदिरावर अनेक वेळा आक्रमणे करण्यात आली आहेत. १६ व्या शतकात सेनापती कालापहाडाने केलेले आक्रमण विशेषतः प्रसिद्ध आहे ज्यामध्ये हे मंदिर लुटले गेले होते. असे असूनही, मंदिराची पुनर्बाधणी वारंवार केली गेली आहे आणि अजूनही त्याची भव्यता आणि धार्मिक महत्त्व टिकून आहे. (PTI Photo) -
मंदिराची रहस्ये
१. असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी ७ भांडी एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे. (PTI Photo) -
२. मंदिरात दिवसा समुद्राकडून जमिनीवर वारा वाहत असल्याचे मानले जाते. संध्याकाळी वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला फडकतो. (PTI Photo)
-
३. जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे २१४ फूट असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पशू-पक्ष्यांची सावली निर्माण होते मात्र या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब राहते. (PTI Photo)
-
४. जगन्नाथ मंदिरावर कधीही विमान उडत नाही किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाही. हे भारतातील कोणत्याही मंदिरात पाहिले गेले नाही. (PTI Photo) (महत्वाचे- यामधील तथ्यांबद्दल लोकसत्ता कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) हेही पाहा- Ashadhi Ekadashi 2025: अवघी पंढरी सजली..! आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ मंदिर कोणी आणि कधी बांधले? मंदिराशी संबंधित ‘ही’ रहस्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील…
Who built Jagannath Temple Puri: आजपासून ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात होत आहे.
Web Title: Who and when built the jagannath temple these mysteries related to the temple will surprise you spl