Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why zerodha nithin kamath warns against chennai super kings and nse ipo stock aam

‘चेन्नई सुपर किंग्ज, एनएसईपासून दूर राहा’, नितीन कामथ यांनी असा सल्ला का दिला? पोस्ट व्हायरल

Zerodha’s Nithin Kamath On CSK: एचडीबी फायनान्शियलच्या प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी सहज पैसे कमविण्याच्या आशेने अनलिस्टेड शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे, या पार्श्वभूमीवर कामथ यांनी हा इशारा दिला आहे.

Updated: June 27, 2025 14:00 IST
Follow Us
  • Nithin Kamath Says stay away from Chennai Super Kings And NSE
    1/9

    झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी एनएसई, एमएसईआय आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या प्री-आयपीओ कंपन्यांमध्ये गुंतवणूकीतून अपेक्षित लिस्टिंगचा फायदा घेऊन नफा मिळवू शकतो, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • 2/9

    याचबरोबर, एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नितीन कामथ यांनी म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना हे जितके सोपे वाटते, तितके सोपे नाही.

  • 3/9

    नितीन कामथ यांनी शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, “अनलिस्टेड शेअर प्लॅटफॉर्म्स अपारदर्शक आहेत. ते सामान्यतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), चेन्नई सुपर किंग्ज, बोट, ओयो रूम्स इत्यादी सारख्या अनलिस्टेड शेअर्सचा पुरवठा एकत्रित करतात, किंमतीत मार्कअप जोडतात आणि नंतर ते विकतात.”

  • 4/9

    “हे प्लॅटफॉर्म्स मार्कअप्स व्यतिरिक्त, कमिशन देखील आकारतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, मार्कअप्स आणि कमिशन ३०–४०% ते १००–२००% पर्यंत असू शकतात. यातील कोणालाही काहीही कळण्याचा मार्ग नाही”, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • 5/9

    “लोकप्रियतेमुळे वेल्थ मॅनेजर्सनी मल्टीबॅगर म्हणून अनलिस्टेड कंपन्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. या मागणीचा अर्थ असा झाला की, वेल्थ मॅनेजर्स आणि अनलिस्टेड शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कमिशनसह अधिक किमतीला शेअर्स विकून अज्ञानी गुंतवणूकदारांकडून पैसे कमवत होते.”

  • 6/9

    लिस्टेड कंपनी म्हणजे काय: जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असते, तेव्हा तुम्ही तुमच्याकडे डीमॅट खाते असल्यास शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. म्हणूनच यासाठी “लिस्टेड शेअर्स” हा शब्द आहे.

  • 7/9

    नावाप्रमाणेच, सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सना अनलिस्टेड शेअर्स म्हणतात. या शेअर्सच्या व्यवहारासाठी कोणतेही एक्सचेंज नसते.

  • 8/9

    अनलिस्टेड शेअर्ससाठी कोणतीही निश्चित किंमत नसते. त्याची किंमत विक्रेता ठरवेल तीच असते. तेथे स्टॉक एक्सचेंजप्रमाणे पारदर्शक किंमत नसते.

  • 9/9

    कामथ यांनी शेअर केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनलिस्टेड शेअर्स असणे ही देखील कर समस्या आहे. “तुम्हाला लाभांशाचा मागोवा मॅन्युअली ठेवावा लागतो आणि शेअर्स विकताना योग्य मूल्याची गणना देखील करावी लागते.” (सर्व फोटो सौजन्य: @Nithin0dha/X)




    )

TOPICS
एनएसईNSEचेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market

Web Title: Why zerodha nithin kamath warns against chennai super kings and nse ipo stock aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.