• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. us educated youth fears losing tcs job and american dream after six months of job hunt reddit post goes viral aam

“असं वाटतंय की दोन्ही गोष्टी गमावेन,” अमेरिकेत शिक्षण घेतलेला तरुण सहा महिन्यांपासून शोधतोय नोकरी

US Degree: एकेकाळी अमेरिकन पदवीकडे समृद्धीची वाट म्हणून पाहिले जायचे. पण आता अमेरिकन पदवी असूनही नोकरी मिळवण्यात असंख्य अडचणी येत आहेत.

June 28, 2025 14:37 IST
Follow Us
  • US Educated Youth Reddit Post
    1/9

    दरवर्षी असंख्य भारतीय विद्यार्थी अमेरिकेत स्वप्ने घेऊन करिअर घडवण्यासाठी जातात. पण प्रत्येकाला पदवीधर झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळेल, असे नाही.

  • 2/9

    नोकरीची अस्थिर बाजारपेठ, मर्यादित एच-१बी व्हिसाच्या संधी आणि इतर विविध समस्यांमुळे त्यांना कठीण पर्यायांना तोंड द्यावे लागते, कमी पगाराच्या नोकरीत समाधान मानावे लागते किंवा घरी परतावे लागते.

  • 3/9

    आकांक्षा आणि वास्तव यांच्यातील वाढत्या दरीवर प्रकाश टाकत, एका रेडिट युजरने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

  • 4/9

    या युजरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला ३ वर्षांचा कामाचा अनुभव आहे. मी २०२३ पर्यंत टीसीएसमध्ये काम करत होतो. त्या वर्षी मी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी सुट्टी घेतली, येथे नोकरी मिळवण्याचे माझे ध्येय होते.”

  • 5/9

    तो पुढे म्हणाला की, “मी माझी पदवी दीड वर्षात पूर्ण केली आणि गेल्या ६ महिन्यांपासून मी नोकरी शोधत आहे. परंतु बाजारातील अस्थिरतेमुळे मला यश मिळाले नाही.”

  • 6/9

    युजरने त्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, “आता मी भारतात परतण्याचा आणि टीसीएसमध्ये पुन्हा नोकरी सुरू करण्याचा विचार करत आहे.”

  • 7/9

    “पण नवीन बेंच पॉलिसी, जिथे ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते, यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे,” असेही या युजरने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

  • 8/9

    “सध्याची परिस्थिती पाहता, मला काळजी वाटते की मी माझी नोकरी आणि माझे अमेरिकन स्वप्न दोन्ही गमावू शकतो. मी खरोखर गोंधळलेलो आहे आणि मार्गदर्शन किंवा सूचनांसाठी मी आभारी आहे.”

  • 9/9

    दरम्यान, या रेडिट युजरने शेअर केलेल्या पोस्टवर असंख्य इतर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये काही सकारात्मक, तर काही नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. (सर्व फोटो सैजन्य: रॉयटर्स)

TOPICS
अमेरिकाAmericaव्हायरल न्यूजViral Newsशिक्षणEducationसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Us educated youth fears losing tcs job and american dream after six months of job hunt reddit post goes viral aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.