• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ceo of 9 big companies of the world have a connection with india know what their qualifications spl

जगातील ९ मोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय; त्यांचे शिक्षण किती आहे माहितीये का?

आजघडीला जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय लोक करत आहेत. आपण अशाच ९ मोठ्या कंपन्याच्या भारतीय वंशाच्या सीईओंबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated: July 3, 2025 15:36 IST
Follow Us
  • indian-origin ceos,sundar pichai,satya nadella,global indian leaders
    1/10

    भारतीय लोक जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील ९ मोठ्या कंपन्यांच्या भारतीय वंशाच्या सीईओंच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा समावेश आहे… (Photo: Freepik)

  • 2/10

    सुंदर पिचाई (Sundar Pichai)
    सुंदर पिचाई यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. ते चेन्नईमध्ये वाढले, आयआयटी खरगपूर (बी.टेक मेटलर्जी), स्टॅनफोर्ड (एमएस) आणि व्हार्टन (एमबीए) येथे शिक्षण घेतले. २०१५ पासून आता ते गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ आहेत. सध्या सुंदर पिचाई कॅलिफोर्नियामध्ये राहतात. (Photo: Social Media)

  • 3/10

    सत्या नाडेला (Satya Nadela)
    सत्या नाडेला यांचा जन्म भारतात झाला. ते हैदराबाद पब्लिक स्कूल आणि मणिपाल इन्स्टिट्यूट (BE) चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी विस्कॉन्सिन-मिलवॉकी विद्यापीठातून एमएस आणि शिकागो बूथमधून एमबीए केले आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष सत्या नाडेला सध्या अमेरिकेतील रेडमंड येथे राहत आहेत. (Photo: Social Media)

  • 4/10

    शंतनू नारायण (Shantanu Narayan)
    शंतनू नारायण यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे, त्यानंतर संगणक विज्ञानात एमएस (बॉलिंग ग्रीन स्टेट) आणि यूसी बर्कले हास येथून एमबीए केले आहे ते २००७ पासून अॅडोबचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत आणि कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहेत. (Photo: Social Media)

  • 5/10

    रवी कुमार एस (Ravi S Kumar)
    रवी कुमार एस २०२३ मध्ये कॉग्निझंटचे सीईओ बनले आहेत, सध्या ते न्यू जर्सी परिसरात राहतात पण त्यांचा जन्म मुंबईतला आहे आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीई आणि भुवनेश्वरच्या झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. (Photo: Social Media)

  • 6/10

    लीना नायर (Leena Nayar)
    भारतात जन्मलेल्या लीना नायर यांनी नेवलचंद कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई पदवी घेतली आहे. त्या चॅनेलच्या (Fashion) सीईओ आहेत आणि पॅरिसमध्ये राहतात. (Photo: Social Media)

  • 7/10

    निकेश अरोरा (Nikesh Arora)
    निकेश अरोरा यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ रोजी गाझियाबाद येथे झाला. ते भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे पुत्र आहेत. त्यांनी एअर फोर्स स्कूल (सुब्रोतो पार्क), आयआयटी-बीएचयू (बी.टेक ईई), बोस्टन कॉलेज आणि नॉर्थईस्टर्न (एमबीए) येथे शिक्षण घेतले आहे. जून २०१८ पासून ते पालो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. (Photo: Social Media)

  • 8/10

    अजय बंगा (Ajay Banga)
    अजय बंगा यांचा जन्म भारतात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठ (बीए इकॉनॉमिक्स) आणि आयआयएम अहमदाबाद (एमबीए) येथे शिक्षण घेतले आहे. मास्टरकार्डचे माजी सीईओ, आता जागतिक बँकेचे अध्यक्ष असलेले अजय सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये राहतात. (Photo: Social Media)

  • 9/10

    जॉर्ज कुरियन (George kurian)
    जॉर्ज कुरियन यांचा जन्म भारतात झाला. त्यांनी प्रिन्सटन येथे बीएसईई आणि स्टॅनफोर्ड येथे एमएसईई/सीएसचे शिक्षण घेतले. ते २०११ मध्ये नेटअॅपमध्ये सामील झाले आणि जून २०१५ मध्ये सीईओ झाले, आता ते सिलिकॉन व्हॅलीमधील एंटरप्राइझ डेटा सिस्टीम्सचे नेतृत्व करत आहेत. (Photo: Social Media)

  • 10/10

    अरविंद कृष्णा (Arvind Krushna)
    अरविंद कृष्णा १९९० मध्ये आयबीएममध्ये सामील झाले, आता ते सीईओ आणि अध्यक्ष आहेत, ते न्यू यॉर्कमध्ये राहतात. त्यांचा जन्म भारतात झाला आणि त्यांनी आयआयटी कानपूर (बी.टेक) आणि इलिनॉय विद्यापीठातून (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- Amarnath yatra 2025: अमरनाथ यात्रा भारतातली सर्वात कठीण यात्रा का आहे? जाणून घ्या…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending TopicबिझनेसBusinessबिझनेस न्यूजBusiness News

Web Title: Ceo of 9 big companies of the world have a connection with india know what their qualifications spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.