-
Ashadhi Ekadashi 2025: आज (६ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महापूजा केली.
-
पंढरपूर वारीमध्ये यंदा सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेतला.
-
‘विठ्ठल रुक्मिणी | तुम्ही अखंड आणा ध्यानी || मग सुखा काय उणे | झाले सोईरे त्रिभुवने || देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन व पूजन..! काही सुंदर क्षण…’ असे कॅप्शन देत अमृता यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी अमृता यांनी केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) होती.
-
पैठणी साडीतील लूकवर अमृता यांनी सुंदर मेकअप करत केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल केली होती.
-
सध्या सोशल मीडियावर अमृता यांच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा सुरू आहे.
-
अमृता यांच्या मंगळसूत्रात सोन्याबरोबर काळे मणी व दोन डवल्या आहेत. मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे.
-
अमृता या गायिका, बँकर व समाजसेवक या रूपाने ओळखल्या जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
पैठणी साडीतील लूकवर अमृता यांनी सुंदर मेकअप करत केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल केली होती.
Web Title: Ashadhi ekadashi 2025 amruta fadnavis orange paithani saree mangalsutra design photos sdn