• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. supreme court to chief election commissioner bjp mp nishikant dubey s controversial statements raj thackeray mns shivsena ubt spl

सर्वोच्च न्यायालय ते ठाकरे बंधू; वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आले आहेत निशिकांत दुबे

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त भाष्य केले आहे. याआधीही निशिकांत दुबे वादग्रस्त भाष्य केल्याने चर्चेत आलेले आहेत. जाणून घेऊयात त्यांची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये

Updated: July 7, 2025 12:29 IST
Follow Us
  • nishikant dubey controversial statements
    1/9

    महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त भाष्य केले आहे. (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 2/9

    महाराष्ट्रात हिंदी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्यांना त्यांनी आव्हान दिले आहे आणि म्हटले आहे की जर त्यांच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मराठी बोलायला लावण्याचा प्रयत्न करा. (File Photo)

  • 3/9

    निशिकांत दुबे यांनी काय म्हटलंय?
    “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे. (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 4/9

    दरम्यान, याआधीही निशिकांत दुबे वादग्रस्त भाष्य केल्याने चर्चेत आलेले आहेत. जाणून घेऊयात त्यांची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 5/9

    महाराष्ट्रातील भाषिक राजकारणाचा संबंध काश्मिरी पंडितांशी जोडला
    निशिकांत यांनी महाराष्ट्रातील भाषावादावर एक्स पोस्ट केली होती. ते म्हणालेले “मुंबईत शिवसेना उद्धव, मनसे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब आणि काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावणारे सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिममध्ये काय फरक आहे? एक हिंदू असल्याने त्यांच्यावर अत्याचार करत आहे आणि दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहे.” (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 6/9

    सर्वोच्च न्यायालयावर वादग्रस्त भाष्य
    न्यायालयात प्रलंबित असलेल्या वक्फ कायद्याशी संबंधित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पण्यांवर निशिकांत दुबे नाराज होते. त्यावरुन त्यांनी कमेंट करताना “देशात धार्मिक युद्ध भडकवण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या मर्यादेपलीकडे जात आहे. जर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत असेल तर संसद आणि विधानसभांना काही अर्थ नाही, ते बंद केले पाहिजेत.” (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 7/9

    मुख्य सरन्यायाधीशांवरही टीका
    त्याचवेळी दुबे यांनी देशाचे तत्कालीन मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावरही टीका केली होती. ते म्हणाले होते, “देशात होणाऱ्या सर्व युद्धांना जबाबदार असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब.” (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 8/9

    मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका
    सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावरील या तीव्र टीकेनंतर, निशिकांत दुबे यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांच्यावरही विधान केले होते. (Photo: Nishikant Dubey/Facebook)

  • 9/9

    निशिकांत दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते, “तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हतात, तुम्ही मुस्लिम आयुक्त होता. तुमच्या कार्यकाळात झारखंडच्या संथाल परगणामध्ये सर्वाधिक बांगलादेशी घुसखोरांना मतदार बनवण्यात आले.” (Photo: Nishikant Dubey/Facebook) हेहा पाहा- शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध; राज्यभर चक्काजाम आंदोलन, कसा असेल नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग?

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending TopicमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj ThackerayहिंदीHindi

Web Title: Supreme court to chief election commissioner bjp mp nishikant dubey s controversial statements raj thackeray mns shivsena ubt spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.