-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
“Wish you live a life devoted for the people…” या शब्दांत त्यांनी आपल्या पतीच्या जनसेवेला सलाम केला आहे.
-
अमृता फडणवीस म्हणतात, “जनतेसाठी समर्पित जीवन हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणते.”
-
त्यांनी पुढे, “तुमच्यावर नेहमी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा,” अशी मंगल कामनाही व्यक्त केली आहे.
-
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नेतृत्वगुणांसाठी आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात. अमृता यांची कॅप्शनही त्याचाच गौरव करते.
-
या पोस्टमध्ये त्यांनी कुटुंबाचा एकत्रित फोटो शेअर करीत कौटुंबिक एकोपाही अधोरेखित केला आहे.
-
अमृता फडणवीस यांनी एक साधा आणि आपुलकीने भरलेला संदेश शेअर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/ इंस्टाग्राम)
“तुमच्यावर नेहमी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक साधा, आपुलकीने भरलेला शुभेच्छा संदेश शेअर केला आहे.
Web Title: Amruta fadnavis birthday wishes for cm devendra fadnavis svk 05