-
प्रिया सचदेव कपूर, एक महिला उद्योगपती आणि माजी मॉडेल आहे. पती उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (All Photos: @priyasachdevkapur/Instagram)
-
पती, उद्योगपती संजय कपूर यांच्या आकस्मिक निधनानंतर कपूर कुटुंबातील सोना ग्रुपच्या मालकीवरून वाद निर्माण झाला आहे.
-
३०,००० कोटींच्या सोना ग्रुपचे नियंत्रण कोणाकडे येणार, यावरून हा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या प्रिया सचदेव यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
प्रिया सचदेव यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून गणित आणि व्यवसाय व्यवस्थापनात पदवी घेतली आहे.
-
लंडनमधील क्रेडिट सुईस फर्स्ट बोस्टन येथे M&A मध्ये प्रिया सचदेव यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली होती.
-
भारतात परतल्यानंतर प्रिया सचदेव यांनी अनेक व्यवसायांचे नेतृत्व केले आणि भारतातील सुरुवातीच्या लक्झरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ‘रॉक एन शॉप’ची सह-स्थापना केली.
-
प्रिया सचदेव या ऑरियस इन्व्हेस्टमेंटमध्ये संचालक आणि सोना कॉमस्टारमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक देखील आहेत.
-
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला प्रिया सचदेव यांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्या जाहिरातींमध्येही दिसल्या. यामध्ये करिना कपूरसोबतच्या एका जाहिरातीचाही समावेश आहे.
-
प्रिया सचदेव यांनी २००५ च्या ‘नील ‘एन’ निक्की’ चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली आहे. (हे ही वाचा: Priya Sachdev: ३० हजार कोटींच्या साम्राज्यामुळे वाद; प्रिया सचदेव कोण आहेत? करिश्मा कपूरच्या माजी पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबात कलह)
Priya Sachdev Kapur: ३० हजार कोटींच्या व्यवसायामुळे वाद; प्रिया सचदेव यांच्याबद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या
Priya Sachdev Kapur: अमेरिकन हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांच्याशी प्रिया सचदेव यांचा पहिला विवाह झाला होता. घटस्फोटानंतर त्यांनी २०१७ मध्ये तिने अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांच्याशी लग्न केले.
Web Title: 5 things about priya sachdev controversy over rs 30000 crore sona comstar business sanjay kapoor wife aam