-
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने हल्ला केला. रेखा गुप्ता दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी घेत असताना ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे पती काय करतात? ते जाणून घेऊया… (Photo: Indian Express)
-
रेखा गुप्ता यांचा जन्म १९ जुलै १९७४ रोजी हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना येथे झाला. जेव्हा त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. (Photo: Indian Express)
-
रेखा गुप्ता यांचे वडील जय भगवान हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते. त्यांच्या आईचे नाव उर्मिला जिंदाल आहे त्या गृहिणी होत्या. (Photo: Indian Express)
-
रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे स्पेअर पार्ट्सचे व्यापारी आहेत. (Photo: Indian Express)
-
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांच्या मुलाचे नाव निकुंज गुप्ता आणि मुलगी हर्षिता गुप्ता आहे. (Photo: Indian Express)
-
रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. संघाच्या विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) माध्यमातून त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम महाविद्यालयाच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. (Photo: Indian Express)
-
मुख्यमंत्री रेखा गुप्ता १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) सचिव झाल्या. त्यानंतर १९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या. (Photo: Indian Express)
-
(Photo: Indian Express) हेही पाहा- इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचं शिक्षण किती? त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घ्या….
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे? पती काय करतात?
Attack On Delhi CM Rekha Gupta, Jansunwai : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता हरियाणातील जींद येथील आहेत पण त्या बालपणीच दिल्लीत आल्या. त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Delhi cm rekha gupta family tree and what does her husband and sun and daughter do marathi information spl