• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sharadiya navratri celebration nine forms of goddess durga power prosperity festival svk

Navratri 2025: पर्वतराजांची कन्या ते सिद्धिदात्रीपर्यंत; देवी दुर्गेचे नवरात्रातील नऊ अवतार

आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. या नऊ दिवसांत साजरे होणारे देवी दुर्गेचे नऊ अवतार व त्यांची माहिती वाचा

September 22, 2025 18:03 IST
Follow Us
  • durga puja
    1/10

    नवरात्रीचा उत्सव : देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना
    नवरात्र, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो, हा देवी दुर्गा आणि तिच्या नऊ दैवी रूपांचा सन्मान करणारा एक उत्साही हिंदू सण आहे. या काळात घरे आणि मंदिरे सजवली जातात, गरबा-दांडियासारखी पारंपरिक नृत्ये रंगतात, भक्तिगीते आणि विधींनी वातावरण भारावते.

  • 2/10

    देवी शैलपुत्री : पर्वतराजांची कन्या
    देवी शैलपुत्री पर्वतांची कन्या मानली जाते. ती शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे. बैलावर स्वार होऊन ती त्रिशूळ आणि कमळ हातात धरते.

  • 3/10

    देवी ब्रह्मचारिणी : तपश्चर्येचे प्रतीक
    देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या, संयम आणि चिकाटीचे प्रतीक मानली जाते. तिच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून ती आध्यात्मिक विकास आणि शिस्तीची प्रेरणा देते.

  • 4/10

    देवी चंद्रघंटा: शौर्याचे प्रतीक
    कपाळावर घंटाकृती चंद्र असलेल्या देवी चंद्रघंटा या शौर्याचे प्रतीक आहेत. त्या अडथळे व भीती दूर करून भक्तांना निर्भयतेचा आशीर्वाद देतात.

  • 5/10

    देवी कुष्मांडा : विश्वनिर्मितीची देवी
    देवी कुष्मांडा यांनी आपल्या दिव्य हास्याने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. त्या जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि चैतन्य आणतात.

  • 6/10

    देवी स्कंदमाता : मातृप्रेमाचे रूप
    भगवान कार्तिकेय (स्कंद) यांच्या माता देवी स्कंदमाता या मातृप्रेम आणि संरक्षणाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या पूजेमुळे भक्तांना बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते.

  • 7/10

    देवी कात्यायिनी : महिषासुरमर्दिनी
    महिषासुर राक्षसाचा पराभव करण्यासाठी योद्धा देवी म्हणून देवी कात्यायिनी अवतरल्या. धैर्य आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यासाठी त्यांची पूजा केली जाते.

  • 8/10

    देवी कालरात्री : भयंकर पण संरक्षक रूप
    देवी कालरात्री या दुर्गेचे सर्वात भयंकर रूप मानले जाते. त्या वाईटाचा नाश करून अंधार दूर करतात आणि भक्तांना संरक्षण व निर्भयता प्रदान करतात.

  • 9/10

    देवी महागौरी : पवित्रतेचे प्रतीक
    देवी महागौरी या तेजस्वी, करुणामय आणि शांतीचे प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने भक्तांना क्षमा, प्रसन्नता आणि आध्यात्मिक प्रगती मिळते.

  • 10/10

    सिद्धिदात्री : सिद्धी प्रदान करणारी
    देवी सिद्धिदात्री या सिद्धी देणाऱ्या देवी आहेत. त्या भक्तांना ज्ञान, समृद्धी आणि आध्यात्मिक समाधानाचे आशीर्वाद देतात.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनवरात्री २०२५Navratri २०२५

Web Title: Sharadiya navratri celebration nine forms of goddess durga power prosperity festival svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.