-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी समितीने जीएसटीमध्ये काही बदल केले आहेत. आता ५, १८ व ४० टक्के (४० टक्के दर काही मोजक्या वस्तूंवर लागणार) अशा तीन स्वरुपात जीएसटी प्रणाली काम करणार आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात आता २२ सप्टेंबर २०२५ पासून तब्बल ३७५ वस्तूंवरील जीएसटी कपातीचा निर्णय घेतला आहे. (संग्रहित फोटो)
-
जीएसटी परिषदेने दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करून मध्यमवर्गासाठी मोठ्या प्रमाणात कर सवलतीची घोषणा केली आहे. (संग्रहित फोटो)
-
दुसरीकडे, तंबाखू, दारू, गुटखा यासारख्या हानिकारक वस्तू तसेच प्रीमियम कार आणि बाईकसारख्या लक्झरी वस्तूंवरील कर दर वाढवण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)
-
दरम्यान, सोन्याची नाणी आणि बारसह दागिन्यांवर जीएसटी दर ३% आणि मेकिंग चार्जेसवर ५% कायम ठेवण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)
-
त्यामुळे तुमच्या सोन्याच्या किंवा कोणत्याही दागिन्यांच्या खरेदीवर नवीन जीएसटी फेरबदलाचा परिणाम होताना किंवा काही फायदा होताना दिसून येत नाही. (संग्रहित फोटो)
-
आता, जर तुम्ही १ लाख रुपयांचे सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी केले तर ३% जीएसटी तसेच मेकिंग चार्जेसवर ५% जीएसटी भरावा लागणार आहे. (संग्रहित फोटो)
-
हेच दर पूर्वीही होते. यामध्ये काहीही बदल होत नाहीये. (संग्रहित फोटो)
हेही पाहा- ‘या’ लोकांसाठी विषासमान आहे दुधी भोपळा, चुकूनही खाऊ नका; अथवा बिघडेल आरोग्य…
GST 2.0 नुसार आता सोने-चांदीवर किती जीएसटी?
New Gst rates on Gold: २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात नवे जीएसटी दर लागू झाले आहेत. यामध्ये सोन्यासंबंधी कोणते बदल झालेत ते पाहूयात…
Web Title: Gst 2 0 on gold details of new rates 2025 in marathi spl