गेल्या काही महिन्यांपासून लातूरमधील बडे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांच्या नावाची समाज माध्यमातून चर्चाही सुरू झाली होती. पण भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या चर्चेला पूर्णविराम देत संभ्रम दूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; तब्बल २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सहभागी होण्याचे आवाहन

लातूरचे प्रिन्स हे कोण आहेत, तुम्हाला चांगले माहिती आहे ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र ते आलेले आपल्या तरुणाला आवडणार नाही, ते येणार नाहीत व आपण त्यांना घेणारही नाही अशा शब्दांत संभाजी निलंगेकर पाटील यांनी देशमुख बंधुच्या प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
लातूरचे भाजपचे राजकारण हे विलासराव देशमुख यांच्या बोटाला धरून झाले .गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांचे मैत्री जगजाहीर होती. देशमुख -मुंडे च्या मैत्रीतूनच हळूहळू भाजपचा लातुरातील वावर सुरू झाला व शक्ती वाढायला लागली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात विलासराव देशमुख यांचे नातेवाईक डॉक्टर गोपाळराव पाटील यांना रिंगणात उतरवण्यापासून भाजपने देशमुख यांच्या सहकार्याने पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केली. दस्तूर खुद्द गोपीनाथ मुंडे यांनीच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या साक्षीने लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील मैदानावर अॅड मनोहरराव गोमारे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी हे जाहीरपणे सांगितले होते. तेव्हा विलासराव देशमुख हयात नव्हते. तेथून सुरू झालेला भाजपचा प्रवास हा आता जिल्ह्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष बनला आहे इथपर्यंत पोहचला आहे.

हेही वाचा- तृणमूलच्या महुआ मोईत्रांनी बनवला चहा अन् होऊ लागली थेट मोदींशी तुलना, कॅप्शन ठरले निमित्त! नेमकं काय घडलं?

देशात व राज्यात सर्वत्र भाजपमधील इन्कमिंग वाढले आहे .त्यामुळे कोणाच्याही बाबतीत ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू राहते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख यांची आमदारकी सुकर व्हावी यासाठी भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली व एका अर्थाने धीरज देशमुख यांना मोकळीक देण्यात आली. त्यातूनच भाजपा हा लातूरात देशमुख यांच्या हिताचे राजकारण करतो या चर्चेने जोर धरला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीत धीरज देशमुख मतदानाला उपस्थित नव्हते त्याचाही वेगळा अर्थ काढण्यात आला होता. . महाविकास आघाडी सरकार गडगडल्यानंतर अमित देशमुख व धीरज देशमुख हे दोघे बंधू हे भाजपात प्रवेश करतील या चर्चेने जोर धरला होता .या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक भाजपचे निलंग्याचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपच्या मेळाव्यात हा विषय उपस्थित केल्याचे बोलले जाते. देशमुख बंधूंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा निदान आता तरी थांबायला हरकत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sambhaji patil nilangekar on amit deshmukh join bjp print politics news dpj