राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणार आहे. या समारोप कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दरम्यान, समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसतर्फे भाजपाविरोधी विचारधारा असलेल्या २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, भारत राष्ट्र पक्षाचे प्रमुख केसीआर आणि गुलाबनबी आझाद यांचा समावेश नाही.

हेही वाचा – “सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यावरच कायदा बनणार का?” उपराष्ट्रपती धनखड यांची पुन्हा आगापाखड; म्हणाले, “मर्यादेचं..”

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
solapur lok sabha, bjp candidate ram satpute
सोलापुरात गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने; तुंबळ घोषणा युद्ध
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट

काँग्रेसने लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपाविरोधी विचारधारा असलेल्या २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होणासाठी पत्र लिहीले आहे. भारत जोडो यांत्रेच्या सुरुवातीलपासूनच आम्ही प्रत्येक भारतीयाला या यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि खासदार या यात्रेत सहभागी झाले आहेत. ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा गांधींच्या स्मृतीस समर्पीत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे, असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, सध्या देशात विरोधकांचा आवाज दाबला जात असताना लाखो लोकं या यात्रेत सहभागी झाले आहेत. देशासमोर आज मोठं संकट आहे. आम्ही महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, चीन संकट सारख्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारतो आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन प्रत्येक जण आपल्या समस्या सांगतो आहे. आपल्याला दलित पीडित, आदिवासींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे या यात्रेत आपण सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – पंजाबचे सरकारच्या मंत्रिमंडळातून आणखी एक मंत्री बाहेर, मुख्यमंत्री भगवंत मान यांची डोकेदुखी वाढली

काँग्रेसचे ‘या’ २१ राजकीय पक्षांना प्रमुखांना पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ज्या २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस, जनता दल (युनायटेड), द्रमुक, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), शिवसेना ( ठाकरे गट), तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी), समाजवादी पक्षाचे (एसपी), बहुजन समाज पक्षाच्या (बसपा), झारखंड मुक्ती मोर्चा, सीताराम येचुरी आणि डी राजा यांच्याशिवाय, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), आरजेडी नेते शरद यादव, आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK), विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP) यांचा समावेश आहे.